मुंबई, 11 फेब्रुवारी : बिग बॉस 13 चा विजेता कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. प्रत्येक जण आपला आवडता स्पर्धकच विजेता होईल असा अंदाज लावत आहे. त्यामुळे विजेता कोण होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. सध्या सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम खान यांच्यात विजेतापदासाठी जोरदार स्पर्धा असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर दोघांचेही फॅन्स आमने-सामने येत आहेत. दोघांचेही फॅन्स सोशल मीडियावरून दोघांनाही ट्रेंड करत आहेत. त्यामुळे यावर्षीचा बिग बॉसचा विजेता या दोघांपैकी एक होणार असल्याच्या चर्चा आहेत.
त्यातचं आता बिग बॉस 13 चा होस्ट सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने एका मुलाखतीत त्याला कोणता स्पर्धेक विजेत्याच्या रुपात दिसतो हे सांगितलं आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं बिग बॉस 13 चा विजेता व्हावा अशी इच्छा या मुलाखतीत शेराने व्यक्त केली आहे. तसचं प्रत्येकाच्या तोंडात विजेता म्हणून सिद्धार्थचचं नाव असल्याचंही त्याने मुलाखतीत म्हटलं आहे.
बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांना सिद्धार्थला हरवणं कठीण आहे, असंही या मुलाखतीत शेरा म्हणला आहे. त्यामुळे सिद्धार्थ शुक्लाचं बिग बॉस 13 चा विजेता होणार असल्याच्या चर्चा आहेत.
BIGG BOSS 13: रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्लाचं काय आहे जुनं कनेक्शन?
बिग बॉस 13 च्या या शेवटच्या आठवड्यात 13 स्पर्धेकांपैकी आता फक्त 7 स्पर्धक उरलेत. सिद्धार्थ शुक्ला, रशमी देसाई, आसिम रियाज, आरती सिंह, पारस छाबरा, शेहनाज गिल आणि माहिरा शर्मा विजेत्याच्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे आता नेमका कोणता स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल हे या आठवड्यातचं कळेल.
तेजश्री प्रधाननं पहिल्याच बॉलिवूड सिनेमात दिला LIP LOCK सीन, पाहा VIDEO