BIGG BOSS 13 : रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्लाचं काय आहे जुनं कनेक्शन? अभिनेत्रीनं केला खुलासा

BIGG BOSS 13 : रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्लाचं काय आहे जुनं कनेक्शन? अभिनेत्रीनं केला खुलासा

बिग बॉस की आदालतमध्ये रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्लाच्या पास्ट स्टोरीचा खुलासा होणार आहे. पत्रकार रजत शर्मा यांनी दोघांना त्यांच्या भूतकाळाबद्दल प्रश्न विचारले. यातून आता त्यांचं नेमकं नातं काय होतं याचा खुलासा होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 11 फेब्रुवारी : बिग बॉस की आदालतमध्ये (Bigg Boss 13) रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्लाच्या पास्ट स्टोरीचा खुलासा होणार आहे. पत्रकार रजत शर्मा यांनी दोघांना त्यांच्या भूतकाळाबद्दल प्रश्न विचारले. यातून आता त्यांचं नेमकं नातं काय होतं याचा खुलासा होणार आहे.

बिग बॉस 13 चा फिनाले आता 4 दिवसांवर येऊन पोहोचला आहे. पुढच्या 4 दिवसात बिग बॉस 13 च्या विजेत्याचं नाव सर्वांसमोर येणार आहे. यावर्षीचा बिग बॉसचा सिझन चांगलाच हिट ठरलाय. नुकतचं अभिनेत्री शिल्पा शेट्टी बिग बॉसच्या घरात गेली होती. आता तिच्यानंतर पत्रकार रजत शर्मा बिग बॉसमध्ये आलेत. रजत शर्मा यांनी सलमान खानलाही कठघऱ्यात उभं केलं. सलमान खानवर प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर आता रजत शर्मा बिग बॉसच्या घरात एन्ट्री मारणार आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांनाही रजत शर्मांच्या प्रश्नांची उत्तर दिली जाणार आहेत. रजत शर्मा आपल्या प्रश्नांमधून अभिनेत्री रश्मी देसाई आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या जुन्या नात्यावर भाष्य करताना दिसणार आहेत.

आज प्रदर्शित केल्या जाणाऱ्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये पत्रकार रजत शर्मा सदस्यांना प्रश्न विचारणार आहेत. फिनालेच्या पार्श्वभूमीवर रजत शर्मांचा हा प्रश्न-उत्तरांचा खेळ चांगलीच रंगत आणणार आहे.

बिग बॉस 13 च्या आजच्या एपिसोडचा प्रीकॅप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये रजत शर्मा रश्मी देसाईला सिद्धार्थ शुक्लाबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत. रश्मी दोघांच्या नात्याबद्दल बोलताना सांगते की, त्याचं नातं 'दिल से दिल तक' आहे. रजत शर्मांनी विचारलेल्या या प्रश्नांचा रोख शो पूर्वी रश्मी आणि सिद्धार्थमध्ये असलेल्या नात्याचा खुलासा करणं हा असल्याचं दिसत आहे. शोमध्ये रश्मी आणि सिद्धार्थ कधीच आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसले नाहीत. त्यामुळे चाहत्यांसाठी हा मोठा खुलासा असणार आहे.

रजत शर्मांनी सिद्धार्थला रश्मी, पारस, आसिम आणि शेहनाजबद्दलही प्रश्न विचारले आहेत. सिद्धार्थ बरोबरच आसिमलाही रजत शर्मांच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. ज्यामध्ये हिमांशी आणि आसिमचं नातं, सिद्धार्थसोबतची मैत्री आणि दुश्मनी याचाही प्रेक्षकांना खुलासा होणार आहे.

First published: February 11, 2020, 7:28 PM IST

ताज्या बातम्या