जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / The Kashmir Files सह वादानंतर आता बंद होणार The Kapil Sharma Show? वाचा काय आहे कारण

The Kashmir Files सह वादानंतर आता बंद होणार The Kapil Sharma Show? वाचा काय आहे कारण

The Kashmir Files सह वादानंतर आता बंद होणार The Kapil Sharma Show? वाचा काय आहे कारण

काही दिवसांपूर्वी ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमामुळे कपिल शर्माच्या या कार्यक्रमाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होते. कपिल शर्माचा हा कार्यक्रम बॉयकॉट करण्याची मागणीही करण्यात आली होती. या द कपिल शर्मा शो विषयी नवीन अपडेट समोर येते आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 जानेवारी: द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show to go Off-air) हा कार्यक्रम सर्रास भारतीय कुटुबांमध्ये पाहिला जातो. विकेंडला येणाऱ्या या शोमुळे कपिल शर्मासह अनेक कॉमेडियन्स, कलाकार घराघरात पोहोचले आहेत. बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या अनेक फिल्म्स या कार्यक्रमामध्ये त्यांचं प्रमोशन करण्यासाठी पोहोचतात. मात्र द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमामुळे कपिल शर्माच्या या कार्यक्रमाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होते. कपिल शर्माचा हा कार्यक्रम बॉयकॉट करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र अनुपम खेर यांच्या ट्वीटनंतर हे प्रकरण शांत झालं होतं. या कार्यक्रमावर द कश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अशी टीका केली होती की, या शोने द कश्मीर फाइल्स प्रमोट करण्यास नकार दिला होता. वादविवादांनंतरही The Kapil Sharma Show हा टीआरपी रेसमध्येही नेहमी आघाडीवर राहिला आहे. आता मात्र TKSS च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. काही मीडिया अहवालानुसार, हा शो लवकरच चाहत्यांचा निरोप घेणार आहे. हे वाचा- The Kashmir Files च्या दिग्दर्शकाला जीवाची भीती, विवेक अग्निहोत्रींच्या ऑफिसमध्ये घुसून दोघांची मॅनेजरला धक्काबुक्की पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, द कपिल शर्मा शो लवकरच कलाकारांच्या इतर वचनबद्धतेमुळे एक छोटासा ब्रेक घेणार आहे. मात्र या एंटरटेनमेंट पोर्टलने असा दावा केला आहे की हा शो लवकरच नवीन सीझनसह कमबॅक देखील करेल. ‘कपिलने अलीकडेच यूएसए आणि कॅनडा दौरा जाहीर केला आहे जो जूनमध्ये सुरू होईल आणि जुलैच्या सुरुवातीपर्यंत सुरू असेल, त्यामुळे त्याची टीम त्यात व्यस्त असेल. याशिवाय, त्यांच्याकडे काही इतर कामांची वचनबद्धता देखील आहेत. या सर्व गोष्टी आधीच हातात असल्याने त्यांनी शोमधून एक छोटासा ब्रेक घेण्याचा आणि नंतर काही महिन्यांनंतर नवीन सीझनसह परतण्याचा विचार केला आहे.  दरम्यान सध्या कपिल भुवनेश्वरहून परतला आहे जिथे तो नंदिता दासच्या चित्रपटासाठी शूटिंग करत होता आणि पुढच्या काही आठवड्यांसाठी प्रसारित होणाऱ्या शोच्या एपिसोडचे शूटिंग त्याने सुरू केले आहे’, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

जाहिरात

कपिलने त्याच्या यूएस कॅनडा ट्रीपविषयी इन्स्टाग्रामवरून देखील माहिती दिली होती. त्यावेळी हा शो ब्रेक घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. आता या मीडिया रिपोर्ट्समुळे या वृत्तांना पुष्टी मिळाली आहे.  वाचा- Desi Girl चा सुंदर Saree Look, प्री-ऑस्कर इव्हेंटमध्ये प्रियंकाचा भारतीय अंदाज; पाहा VIDEO कपिल शर्मा सध्या नंदिता दास यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगमधअये व्यस्त आहे. ज्यामध्ये शाहना गोस्वामी देखील मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचे नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा कपिलने चित्रपटाची घोषणा केली तेव्हा त्याने खुलासा केला की तो या चित्रपटात फूड डिलिव्हरी रायडरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात