मुंबई, 24 मार्च: देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Desi Girl Priyanka Chopra) नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी प्रियंका चोप्रा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या स्टाइलसाठीही ओळखली जाते. प्रियंका सर्व प्रकारच्या आउटफिट्समध्ये सुंदर दिसते. दरम्यान कोणत्या प्रसंगी कोणता लुक कॅरी करायचा हे PC ला उत्तम माहित आहे. अभिनेत्री कोणत्याही लुकमध्ये सुंदर दिसते पण साडीची बातच काही और आहे! दरम्यान एका आंतरराष्ट्रीय इव्हेंटमध्ये प्रियंकाने साडीलाच पसंती दिली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. देसी गर्लने पुन्हा एकदा तिचा भारतीय अंदाज जगाला दाखवून दिला. साउथ एशियन एक्सलन्स फिल्म्स (South Asian Excellence) च्या प्री-ऑस्कर इव्हेंटसाठी (Priyanka Chopra at Pre-Oscar Event) प्रियंका चोप्राने काळ्या रंगांची साडी परिधान केली होती. या ब्लॅकसाडीसह तिने स्ट्रॅपलेस ब्लाउज कॅरी केला होता. यामध्ये तिचा ‘देसी गर्ल’ लुक नक्कीच लक्ष वेधणारा होता. हे वाचा- शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार ‘ही’ साऊथ सुंदरी,घेते रश्मिका-समंथापेक्षाही जास्त मानधन यंदाचा ऑस्कर सोहळा 27 मार्चला होणार आहे. त्याआधी मंगळवारी 23 मार्च रोजी प्री-ऑस्कर इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रियंका चोप्रासह मिंडी कलिंग, कुमेल नानजियानी, अंजुला आचारिया, बेला बाजारिया, मनीश के. गोया आणि श्रुती गांगुली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसले. दरम्यान प्रियंका चोप्राची ऑस्कर सोहळ्यातील ही पहिलीच उपस्थिती नाही. याआधीच्या ऑस्कर सोहळ्यातही अभिनेत्री पुरस्कार देताना आणि नामांकनांची घोषणा करताना दिसली होती. हे वाचा- PHOTOS: प्रग्नेन्सीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच दिसली सोनम कपूर, बेबी बम्पही केला फ्लॉन्ट या इव्हेंटच्या फॅन क्लब्सनी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये प्रियंका चोप्रा पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीला साडीत पाहून चाहतेही अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. कोणी तिला अमेझिंग तर कोणी साडीत सुंदर दिसत आहेस, अशा प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले ‘ओएमजी, या साडीत तू किती सुंदर दिसत आहेस’. तर एकाने प्रियंकाला ‘गॉर्जियस मम्मी’ म्हटले आहे.
दरम्यान वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रियंका शेवटची ‘The Matrix Resurrections’ मध्ये दिसली होती. या सिनेमाने जगभरात लोकप्रियता मिळवली होती, यामध्ये प्रियंकाच्या भूमिकेचे नाव सती असे होते. दरम्यान सिटाडेल, टेक्स्ट फॉर यू, एंडिंग थिंग्ज आणि जी ले जरा हे प्रियंकाचे काही अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत.