Home /News /entertainment /

'अनुपमा' फेम रुपालीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट करत दिली माहिती

'अनुपमा' फेम रुपालीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट करत दिली माहिती

अनुपमा (Anupama) या हिंदी टीव्ही मालिकेतून रुपाली गांगुलीला मोठी पसंती मिळत आहे.

मुंबई, 2 जुलै: टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली (TV Actress Rupali Ganguly) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनुपमा (Anupama) या हिंदी टीव्ही मालिकेतून प्रसिद्धी मिळालेली रुपाली गांगुली हिने नुकतीच नवी कोरी फोर व्हिलर (Four Wheeler) खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी रुपाली शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या नव्या कोऱ्या झगमगत्या लाल रंगाच्या जीपचा (Jeep) फोटो देखील इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या छायाचित्रात जीपच्या कडेला रुपाली पती अश्विन वर्मासह दिसत असून ते दोघे या नव्या खरेदीमुळे विलक्षण आनंदी दिसत आहेत. या छायाचित्रात रुपाली देसी लूकमध्ये दिसत असून तिने पिवळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे तर पती अश्विनने शर्ट आणि बर्मुडा शॉर्टस परिधान केले आहे. या छायाचित्राच्या कॅप्शन मध्ये रुपालीने देशी बनावटीची कार खरेदी केल्यानं `प्राऊड इंडियन` (Proud Indian) असं लिहिलं आहे. तसंच ती लिहिते, `बी इंडियन, बाय इंडियन अॅण्ड सपोर्ट इंडियन`. तिने नुकत्याच खरेदी केलेल्या महिंद्रा थारची (Mahindra Thar) किंमत सुमारे 14 लाख रुपये आहे, असे टाईम्स नाऊ डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
View this post on Instagram

A post shared by Rups (@rupaliganguly)

थार खरेदीचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करताच या दांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. अभिनेत्री जस्वीर कौर कमेंट करताना लिहिते की मी राईडसाठी फार वाट पाहू शकत नाही. तसेच नेटिझन्सनी सर आणि मॅडम तुमचे अभिनंदन अशा कॉमेंट करत रुपाली आणि अश्विनला शुभेच्छा दिल्या आहेत. (हे वाचा: 'My First Reel' म्हणत मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने शेयर केला VIDEO ) रुपाली गांगुलीने दिला आठवणींना उजाळा यातच अनुपमाच्या सेटवर अचानकपणे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी भेट दिल्याने कलाकारांसह सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी रुपालीने मिथुन यांच्यासोबतची छायाचित्रे शेअर करताना आठवणींना उजाळा दिला आणि काही अज्ञात गोष्टीही स्पष्ट केल्या. याबाबत रुपाली म्हणते की मी प्रथम कॅमेरासमोर आले तेव्हा मी 4 वर्षांची होते. अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट मी मिथुनदा यांच्यासोबत केला. यावेळी सेटवर मला माझे वडिल आणि मिथुनदा सतत रागवायचे. मी स्वतःला अभिनेत्री म्हणून गांभिर्याने घ्यावे, असा सल्ला ते सातत्याने द्यायचे, असे रुपालीने मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयीच्या आठवणी लिहिताना सांगितलं आहे. (हे वाचा:कलेचं माहेरघर संकटात; जयप्रभा-शालिनी स्टुडीओच्या बचावासाठी आंदोलन  ) अशी आहे महिंद्रा कंपनीची थार जीप कार देखो डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, महिंद्राने ऑक्टोबर 2020मध्ये नव्या सेकंड जनरेशनची (New Second Generation) थार बाजारात आणली. ही नवी थार आयकॉनिक (Iconic), मोठी आणि आधुनिक आहे. ही थार रॉकी बेज, अॅक्वामरीन, मिस्टीक कॉपर, रेड, नॅपोली ब्लॅक आणि गॅलेक्सी ग्रे या 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे. महिंद्रा थारची किमत 12.12 लाख ते 14.17 लाख रुपयांपर्यंत आहे. पेट्रोल व्हर्जनच्या (Petrol Version) थारची किंमत 12.12 लाख ते 13.96 लाख रुपये तर डिझेल व्हर्जन (Diesel Version) थारची किंमत 12.32 ते 14.17 लाख रुपये आहे.
First published:

Tags: Entertainment, Tv actress, Tv serial, TV serials

पुढील बातम्या