मुंबई, 2 जुलै- कोल्हापूरला (Kolhapur) सुरुवातीपासून केलेचा वारसा लाभला आहे. कोल्हापूरकरांनी नेहमीचं कलेची जोपासना केली आहे. मात्र आज याच कलेला चिरंतर ठेवण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे. कोल्हापूरात जयप्रभा (Jayprabha Studio) आणि शालिनी स्टुडीओ(Shalini Studio) वाचविण्यासाठी रंगमंचावरील लोक एकत्र आले आहेत. आज कोल्हापूरात जयप्रभा आणि शालिनी स्टुडीओ वाचविण्यासाठी अनेक रंगकर्मी तसेच आखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे लोक आंदोलनाला बसले आहेत. कोल्हापुरात पिढ्यांपिढ्या कलेचा वारसा जपणाऱ्या जयप्रभा स्टुडीओच्या जागेवर सरकारने रेखांकन करण्याचा आदेश दिला आहे. आणि हा आदेश मागे घेण्यात यावा यासाठी आज हे आंदोलन करण्यात येत आहे. हे ठिकाण एक ऐतिहासिक वारसा जपणारं ठिकाण आहे. या जागेमुळे अनेक कलाकार घडले आहेत. जे आज संपूर्ण देशात आपलं नावं कमवत आहेत. त्यामुळे या जागेवर बांधकामास परवानगी अजिबात देऊ नये अशी मागणी रंगकर्मी आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून करण्यात येत आहे. (हे वाचा: New Crush! आर्या आंबेकरचं पारंपारिक वेशात खुललं सौंदर्य; पाहा PHOTO ) सध्याची परिस्थिती बघता अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तसेच रंगकर्मींनी एकमेकांना साथ देत मूक आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलन कर्त्यांच्या हातातील फलकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘कलेचे माहेरघर असणाऱ्या जयप्रभा आणि शालिनी स्टुडीओचं जतन झालचं पाहिजे’, कोल्हापूर चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक वारसा जतन झालाचं पाहिजे’, शालिनी स्टुडीओ रेखांकन आदेश रद्द झालाच पाहिजे’ अशा विविध घोषणा या फलकांवर लिहिण्यात आल्या आहेत. (हे वाचा: HBD:‘टाईमपास’ची चंदा ते स्विटू;पाहा ठाण्याची अन्विता कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री ) तसेच आंदोलनाचाचं भाग म्हणून शनिवारी ऐतिहासिक बिंदू चौकात कॅन्डल मार्च आणि लाक्षणिक उपोषणसुद्धा करण्यात येणार आहे. इतकचं नव्हे तर सरकारने या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.