मुंबई, 2 जुलै- मराठीतील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला (Sonali Kulkarni) ओळखलं जातं. सोनालीने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांवर आपली एक खास छाप पाडली आहे. चित्रपटांतून चाहत्यांचं मनोरंजन करणारी सोनाली अलीकडे सोशल मीडियावरसुद्धा सक्रीय झाली आहे. सध्या सोनाली आपल्या विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच सोनालीने इन्स्टाग्रामवर (Instagram) आपला पहिला रील बनवला आहे. आणि तो चाहत्यांसोबत शेयर केला आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीचं आपल्या वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखली जाते. सोनालीने आजपर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. आणि म्हणूनचं तिला मराठीतील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. सोनालीने चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. मात्र बदलत्या काळानुसार बदल करत सोनाली सध्या सोशल मीडियावरसुद्धा सक्रीय झाली आहे. ती सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते. (हे वाचा: सई लोकूरचा कोल्हापुरी तडका; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात ) सोनालीने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा इन्स्टाग्राम रील आहे. आणि सोनालीने हा रील पहिल्यांदाचं बनवला आहे. आणि तो आपल्या चाहत्यांशी शेयर केला आहे. त्याचंसोबत कॅप्शन देत ‘माय फर्स्ट रील’ असं देखील म्हटलं आहे. यामध्ये सोनाली गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खुपचं सुंदर दिसत आहे. सोनालीचा हा मनमोहक रील चाहत्यांना खुपचं पसंत पडला आहे. चाहते कमेंट करून सोनालीचं कौतुकदेखील करत आहेत. (हे वाचा: कलेचं माहेरघर संकटात; जयप्रभा-शालिनी स्टुडीओच्या बचावासाठी आंदोलन ) अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठीमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. अग्ग बाई अरेच्चा 2, डॉ. प्रकाश बाबा आमटे अशा चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. फक्त मराठीचं नव्हे तर सोनालीने हिंदी चित्रपटातदेखील काम केलं आहे. सोनालीची ‘सिंघम’ या चित्रपटातील एका पोलीस अधिकाराच्या पत्नीची भूमिका सर्वांनाचं लक्षात राहिली आहे. तसेच सोनाली छोट्या पडद्यावरील क्राईम शो ‘क्राईम पेट्रोल’ सुद्धा होस्ट करताना दिसून येते.