मुंबई, 30 एप्रिल: अर्शी खान (
Arshi Khan) हे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये तसं प्रसिद्ध असणारं नाव आहे. बिग बॉस 11 (
Bigg Boss 11) मध्ये तिने तिच्या स्पष्ट आणि शुद्ध अशा उर्दू बोलण्याने अनेकांची मनं जिंकून घेतली होती. बिग बॉसच्या घरात तिने अनेकांशी वादही घातले. ती पुन्हा एकदा बिग बॉस 14 (
Bigg Boss 14) मध्येही दिसली होती. अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान (
Salman Khan Bigg Boss) याने देखील अनेकदा तिचे कौतुक केले आहे. दरम्यान अलीकडेच असे वृत्त समोर आले आहे की अर्शी खान हिने दुबईमध्ये साखरपुडा उरकला आहे, मात्र आता यावर अर्शी खान हिने मौन सोडले (
Arshi Khan breaks silence about getting engaged) आहे.
अर्शी खान हिने तिच्या साखरपुड्याच्या बातम्यांने खंडन केले आहे आणि या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार अर्शी खान केवळ सुट्टी एंजॉय करण्यासाठी दुबईमध्ये गेली आहे. रिपोर्टनुसार, तिने दीर्घ काळापासून कोणताही ब्रेक न घेतल्याने आता तिने असा निर्णय घेतला आहे.
हे वाचा-रणवीर सिंह नव्हे तर 'या' खास व्यक्तीसोबत दीपिका पादुकोण पोहोचली व्हेनिस,घेतेय सुट्टीचा आनंद
साखरपुड्याची केवळ अफवा- अर्शी
अर्शीने यावेळी असे म्हटले की तिच्या फिल्म्स, वेब शो आणि म्युझिक व्हिडीओ यामुळे बॅक टू बॅक शूटिंग होती. गेल्या बऱ्याच काळापासून ती सुट्टीसाठी कुठे बाहेर गेली नव्हती. आता वेळ मिळाला म्हणून तिने रमजानच्या पवित्र महिन्यात दुबईमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या मते, जेव्हा ती दुबईत पोहोचली तेव्हा तिच्या साखरपुड्याची अफवा पसरली. तिने स्पष्ट केले आहे की ती दुबईमध्ये साखरपुडा करण्यासाठी पोहोचली नव्हती.
हे वाचा-सनी लियोनीचं घर नेमकं किती कोटींचं? 16 कोटीच्या फ्लॅटवर अभिनेत्रीने सोडलं मौन
अभिनेत्रीने असे म्हटले की तिचे दुबईवर प्रेम आहे. कामातून छोटासा ब्रेक घ्यायचा असेल तर ही चांगली जागा आहे. दुबई हे जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा आणि विविध शॉपिंग मॉल्स यांसारख्या समकालीन प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. हे शहर अनेक सांस्कृतिक आकर्षणांचे केंद्र आहे. तसेच याठिकाणी करण्यासाठी खूप काही आहे. मी माझ्या सुट्टीचा आनंद घेत आहे, असेही अर्शी खान यावेळी म्हणाली आणि तिने साखरपुड्याच्या बातम्यांवर पूर्णविराम दिला आहे.
अफगाणीस्तानमधील क्रिकेटरशी साखरपुडा केल्याच्या होत्या चर्चा
काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की अर्शी खान हिचा साखरपुडा अफगाणीस्तानातील क्रिकेटरशी होणार आहे. हा कोणता क्रिकेटर आहे हे मात्र समोर आले नव्हते. मात्र असे म्हटले जात होते की अर्शी खानसाठी तिच्या वडिलांना हे स्थळ पसंत नव्हते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.