मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सनी लियोनीचं घर नेमकं किती कोटींचं? 16 कोटीच्या फ्लॅटवर अभिनेत्रीने सोडलं मौन

सनी लियोनीचं घर नेमकं किती कोटींचं? 16 कोटीच्या फ्लॅटवर अभिनेत्रीने सोडलं मौन

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री सनी लिओनी   (Sunny Leone)  चित्रपटांसोबतच तिच्या खाजगी आयुष्यामुळेसुद्धा चर्चेत असते. गेल्या वर्षी, ती कुटुंबासह मुंबईतील एका आलिशान घरामध्ये शिफ्ट झाली होती. जेव्हा सनी लिओनी तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली तेव्हा अभिनेत्रीने ते अपार्टमेंट तब्बल 16 कोटी  (16 Crores House) रुपयांना विकत घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 एप्रिल-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री सनी लिओनी   (Sunny Leone)  चित्रपटांसोबतच तिच्या खाजगी आयुष्यामुळेसुद्धा चर्चेत असते. गेल्या वर्षी, ती कुटुंबासह मुंबईतील एका आलिशान घरामध्ये शिफ्ट झाली होती. जेव्हा सनी लिओनी तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली तेव्हा अभिनेत्रीने ते अपार्टमेंट तब्बल 16 कोटी  (16 Crores House) रुपयांना विकत घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. जेव्हा घराची किंमत समोर आली तेव्हा सनी भडकली आणि तिने हा रिपोर्ट खोटा असल्याचा सांगत रिपोर्ट्सवर राग व्यक्त केला आहे. सध्या सनी लियोनीचं हे घर चांगलंच चर्चेत आलं आहे.

अभिनेत्री सनी लिओनि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते सनी आपला पती आणि मुलांसोबत जास्तीत-जास्त वेळ भारतात घालविते. ती सतत आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसून येते. दरम्यान जेव्हा सनीने तिच्या नवीन घराच्या किमतीची बातमी पाहिली तेव्हा तिला धक्काच बसल्याच म्हटलं जात आहे. आता अभिनेत्रीने या प्रकरणावर मौन सोडलं आहे. याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, ''मला वाटते की अशा गोष्टी लोकांसमोर ठेवण्यापूर्वी त्यांची योग्य पडताळणी करणं हे मीडियाचं काम आहे'.

अलीकडेच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सनी म्हणाली, 'आता कोण आपल्या घरासाठी किती पैसे खर्च करतो याची कोणाला चिंता आहे?ती पुढे म्हणाली की, कधीकधी लोक त्रास देण्यासाठी खूप हास्यास्पद गोष्टी बाहेर समोर आणतात'. ती म्हणाली की, जर माझ्या कुटुंबाला घर आवडलं असेल तर बाकी गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. आईवडील आपल्या मुलांच्या चांगल्यासाठी खूप काही करतात. आम्हीही केलं आणि त्याचा आम्हाला खूप आनंद होतो'.

त्यांनतर अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, ती खाजगी आयुष्यातील अशा अफवांना कशी सामोरं जाते? तेव्हा ती म्हणाली 'मला त्याची पर्वा नसते. पण, मला त्या दिवशी नक्कीच फरक पडेल, जेव्हा माझ्या मुलांबद्दल काहीतरी चुकीचे असेल किंवा असे काहीतरी घडेल, ज्यामुळे त्यांचं नुकसान होईल. आपल्याबाबत बोलताना सनी म्हणाली, 'आयुष्याच्या या टप्प्यावर मला आता अशा गोष्टींची फारशी पर्वा नाही'.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Sunny Leone