जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / टीव्हीची प्रसिद्ध खलनायिका लवकरच होणार आई, शेअर केला नवऱ्याबरोबरचा क्यूट VIDEO

टीव्हीची प्रसिद्ध खलनायिका लवकरच होणार आई, शेअर केला नवऱ्याबरोबरचा क्यूट VIDEO

टीव्हीची प्रसिद्ध खलनायिका लवकरच होणार आई, शेअर केला नवऱ्याबरोबरचा क्यूट VIDEO

अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) ने तिच्या नवऱ्याबरोबर एक क्यूट व्हिडीओ शेअर करत तिच्या प्रेग्नन्सीची बातमी दिली आहे. तिने बेबी बंपचा क्यूट व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑक्टोबर : सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारी अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) ने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना खूशखबर दिली आहे. अनिता हसनंदानी प्रेग्नंट असल्याची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. अनिता गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक सरप्राइज देणार आहे अशा पोस्ट शेअर करत होती. अखेर तिने शनिवारी याबाबत एक व्हिडीओ पोस्टकेला आहे. अनिताने तिचा नवरा रोहित रेड्डीबरोबर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये दोघांनी काही सेकंदात त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे. अगदी सुरुवातीला मित्र होण्यापासून ते लग्न होईपर्यंत. तर या व्हिडीओत अखेरीस प्रेगन्सीबाबत सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये अनिता क्यूट बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. दोघांचा हा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (हे वाचा- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेत दयाबेनची पुन्हा होणार एंट्री? ) चाहत्यांपासून अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. ‘ये है मोहब्बतें’ असो किंवा ‘नागीन’ अनिताचा अभिनय तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडत आला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील चाहते नेहमी उत्सुक असतात. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अनिताने नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर शेअर केले आहे. आता तिने प्रेग्नन्सीबाबत घोषणा केल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जाहिरात

(हे वाचा- ‘ही माफिया गँग मला मारून टाकेल आणि…’,पायल घोषने थेट पंतप्रधानांकडे मागितली मदत )  ‘Getting Ready for Reddy’ असं कॅप्शन देत अनिताने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओनंतर अनिताने रोहितबरोबर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये देखील अनिता बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांची आई-बाबा होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला आहे.

2013 मध्ये अनिता आणि रोहितने लग्न केले होते. लग्नाच्या 7 वर्षानंतर वयाच्या 39 व्या वर्षी अनिता आई बनणार आहे. तिने या व्हिडीओच्या माध्यमातून तिचा आनंद व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात