• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेत दयाबेनची पुन्हा होणार एंट्री? निर्मात्यांनी दिली ही माहिती

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेत दयाबेनची पुन्हा होणार एंट्री? निर्मात्यांनी दिली ही माहिती

सध्या टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे. यामधील दयाबेन अर्थात दिशा वकानी (Disha Vakani) दीर्घकाळापासून शोमध्ये नाही आहे. सध्या ती तिचा मॅटर्निटी पीरिएड एन्जॉय करत आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 ऑक्टोबर:  'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ने नुकतेच त्याचे 3000 एपिसोड पूर्ण केले. यानिमित्त संपूर्ण टीमने दणक्यात सेलिब्रेशन देखील केले. काही दिवसांपूर्वी या शोमधील दोन कलाकार नेहा मेहता (Neha Mehta) आणि गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) यांनी मालिकेला अलविदा केले आहे. त्यांच्याजागी प्रेक्षकांना काही नवे चेहरे पाहायला मिळत आहेत.  दरम्यान या कार्यक्रमात गेले 3 वर्ष न दिसेलेली दयाबेन अर्थात दिशा वकानी कमबॅक करेल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 'दयाबेन' अर्थात अभिनेत्री दिशा वकानी जवळपास 3 वर्ष दिसली नाही आहे. ती परत येणार का याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. नवरात्रीच्या एपिसोडमध्ये दयाबेन कमबॅक करणार असल्याचा चर्चा सध्या टेलिव्हिजन विश्वामध्ये आहेत. दयाबेन परत येणार का याबाबत माधवी भाभी अर्थात सोनालिकाने (Sonalika) अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'मला याबाबत सध्या कोणती माहिती नाही आहे. आम्हाला देखील इतरांकडूनच याबाबत समजते आहे.3 वर्षांपासून अशा बातम्या येत आहेत मात्र कोणती पक्की माहिती नाही'. (हे वाचा-'भारतात गांजा कायदेशीर झाला पाहिजे...', या बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा) दिशा 2008 पासून या शोमध्ये आहे. 2017 मध्ये लग्नानंतर ही यात दिसली नव्हती. तिची मुलगी स्तुतीच्या जन्मानंतर तिने यातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर अनेकदा ती कमबॅक करणार असल्याच्या चर्चा झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाचे निर्माते असीत कुमार मोदी (Asit Kumar Modi) यांनी देखील अद्याप काही निश्चित नसल्याचे म्हटले होते. (हे वाचा-'ही माफिया गँग मला मारून टाकेल आणि...',पायल घोषने थेट पंतप्रधानांकडे मागितली मदत) मीडिया अहवालांच्या मते मेकर्स दिशा वकानीला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. निर्माते तिने कमबॅक करावं याकरता प्रयत्नशील आहेत मात्र दिशा याकरता तयार नाही अशा देखील चर्चा टेलिव्हिजन विश्वात रंगल्या आहेत. प्रेक्षक देखील दयाबेनची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'दयाबेन' हे प्रेक्षकांचे आवडीचे पात्र आहे. नवरात्रीच्या एपिसोडमध्ये दयाबेन कमबॅक करणार याबाबत देखील चर्चा सुरू आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: