Home /News /viral /

चक्क एका सिंहिणीने सिंहाच्या तावडीतून केली माणसाची सुटका; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

चक्क एका सिंहिणीने सिंहाच्या तावडीतून केली माणसाची सुटका; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

सिंहाने हल्ला करताच माणसाच्या मदतीसाठी धावून आली सिंहिण.

    मुंबई, 17 मे :  प्राण्यांचे हल्ल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असातत, जे तुम्ही पाहिले असतील. सिंह ज्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं, जंगलातील इतर प्राण्यांचीही जो गय करत नाही त्याच्यासमोर माणसांचा काय टिकाव लागणार? (Lion Attack Video). मग तो सिंह असो वा सिंहिणी आहे तर हिंस्र प्राणीच. त्याला फक्त आपली शिकार आणि भूक महत्त्वाची. त्यामुळे एका सिंहाने हल्ला केला तर इतर सिंहही शिकारीवर तुटून पडतात. असंच दृश्य आपण नेहमी पाहत आलो आहोत. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (Viral Video On Social Media), जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही (Lion Attacked Zookeepers Video). चक्क एका सिंहिणीने माणसाचा जीव वाचवला आहे. सिंहाने या व्यक्तीवर भयंकर हल्ला केला (Lioness Rescue Man From Lion’s Attack) . तेव्हा त्याच्या मदतीसाठी सिंहिण धावून आली. तिने सिंहाच्या तावडीतून माणसाची सुटका केली आहे. असा व्हिडीओ याआधी तुम्ही कदाचित कधीच पाहिला नसेल. हे वाचा - अविश्वसनीय! शिकार समोर असून खतरनाक बिबट्याने केला नाही हल्ला; VIDEO पाहून कारण सांगू शकाल का? रेडिटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एका प्राणीसंग्रहालयातील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता एका काचेच्या मागे एक सिंह आणि सिंहिण बसलेले दिसत आहेत. त्यांच्याजवळ दोन व्यक्तीही उभ्या असलेल्या दिसत आहेत. दोघंही या प्राणीसंग्रहालयात काम करणारे कर्मचारी आहेत. या दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीवर सिंह अचानक हल्ला करतो. एक व्यक्ती या सिंहाच्या जवळ जातो. तेव्हाही हा सिंह शांत असतो. पण थोड्या वेळाने त्याला काय होतं कुणास ठाऊक अचानक तो दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला करतो. तिथं उभी असलेली व्यक्ती बचावासाठी धावते. त्या व्यक्तीला सिंहाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करते. तिथं असलेली सिंहिणही हे सर्व पाहून तिथं धावून जाते. पण ती सिंहाप्रमाणे हल्ला करत नाही तर उलट सिंहाला शांत करण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला सिंहाच्या तावडीतून सोडवण्यासाठी मदत करते. ती व्यक्ती सिंहाच्या तावडीतून काही वेळासाठी सुटतेही पण सिंह पुन्हा त्या व्यक्तीवर धावून जातो. हे वाचा - अवाढव्य अजगर मानेभोवती गुंडाळून देत होता पोझ; VIDEO चा शेवट पाहून अंगावर काटा येईल अखेर कसंबसं सिंहिणी सिंहाला शांत करते आणि त्या व्यक्तीपासून दूर घेऊन जाते. सिंहही हळूहळू शांत होतो. सिंहिणीने मध्यस्थी केल्याने दोन्ही झूकिपर्सचा जीव वाचला आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या