जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आज तू जाऊन 2 वर्षे झाली..' अभिनेता हार्दिक जोशी आजही या खास मित्राला करतो मिस

'आज तू जाऊन 2 वर्षे झाली..' अभिनेता हार्दिक जोशी आजही या खास मित्राला करतो मिस

'आज तू जाऊन 2 वर्षे झाली..' अभिनेता हार्दिक जोशी आजही या खास मित्राला करतो मिस

हार्दिकनं त्याच्या खास मित्रासोबतचा एक फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे. त्याचा हा मित्र आता या जगात नाही, त्याच्या आठवणीत त्यानं ही पोस्ट लिहिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मे- मागच्या काही दिवसांपासून तुझ्यात जीव रंगलामधील सर्वांचा लाडका राणादा म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी ( hardeek joshi ) अभिनेत्री अक्षया देवधरसोबतच्या साखरपुड्यामुळं सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता हार्दिकनं त्याच्या खास मित्रासोबतचा एक फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे. त्याचा हा मित्र आता या जगात नाही, त्याच्या आठवणीत त्यानं ही पोस्ट लिहिली आहे. हार्दिकचा हा मित्र दुसरा तिसरा कोण नसून त्याचा कुत्रा ( hardeek joshi dog) आहे. त्याच्या लाडक्या कुत्र्यासोबतचा एका फोटो शेअर करत त्यानं त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. आज त्याचा हा कुत्रा या जगात नाही पण हार्दिक आजही त्याला विसरू शकलेला नाही. त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मिस यू ‘बडी’🐶, माझ्या भावा.. माझा मस्तीखोर मुलगा, माझा मित्र, माझा सोबती. आज तू आम्हाला सोडून 2 वर्षे झाली, पण तू आत्ताच आम्हाला सोडून गेल्यासारखं वाटतं..अशी भावुक पोस्ट हार्दिकनं केली आहे.

जाहिरात

मराठीत असे अनेक कलाकार आहेत जे प्राणीप्रेमी आहेत. रिंकू राजगुरू, मानसी नाईक, सिद्धार्थ चांदेकर, जुई गडकरी, मिताली मयेकर हे कलाकार अनेकदा त्यांच्या पेटसोबत व्हिड़िओ शेअर करत असतात. मानसी नाईक आणि जुई गडकरी यांना तर कॅट मॉम या नावानं ओळखलं जातं. या दोघींना मांजरी खूप आवडतात. दोघींनीही घरात मोठ्या संख्येने मांजरी पाळल्या आहेत. रिंकू राजगुरूचं मांजरप्रेम कुणापासून लपलेलं नाही. ती अनेकादा मांजरासोबतचे क्यूट व्हिडिओ शेअर करत असते. शेवटी प्राण्यांना तुम्ही जितकं प्रेम कराल तितके ते करत असतात. त्यामुळं त्याचं जाणं कदाचित आपण पचवू शकत नाही. वाचा- माझी तुझी रेशीमगाठ : छोट्या परीचा बेस्ट फ्रेंड ओजस आहे ‘या’ अभिनेत्याचा मुलगा झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली बाई आणि राणादा या ऑनस्क्रीन जोडीला खूप लोकप्रियता मिळाली. ही ऑनस्क्रीन जोडी आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत एंगेज झाली आहे. अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे सेलिब्रिटी कपल आता विवाह बंधनात अडकणार आहे. अक्षय तृतियाच्या मुहूर्तावर या दोघांनी आपल्या साखरपुड्याचे खास फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. चाहते आता या दोघांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात