'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचं पुन्हा प्रसारण, अमोल कोल्हे यांनी FB पोस्ट करून सांगितली नवी वेळ

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचं पुन्हा प्रसारण, अमोल कोल्हे यांनी FB पोस्ट करून सांगितली नवी वेळ

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत संभाजी राजेंची भूमिका साकारणारे अभिनेता आणि खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 मार्च: कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर दूरदर्शनवर 'रामायण'  मालिका पुनर्प्रक्षेपीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका पुन्हा प्रसारित करावी, अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य करत झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत संभाजी राजेंची भूमिका साकारणारे अभिनेता आणि खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.  एवढेच नाही तर अमोल कोल्हे यांनी मालिकेची नवी वेळ सांगितली आहे.

हेही वाचा...धक्कादायक: सांगलीत कोरोनाबाधित कुटुंबाच्या संपर्कात आले 337 नागरिक

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका झी मराठी वाहिनीवर 30 मार्चपासून पुन्हा  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  दुपारी 4 वाजता ही मालिका प्रसारित होईल. विशेष म्हणजे पहिल्या दिवसाचा दोन तासांचा भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानंतर दररोज  दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असं अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिणामी या काळात नागरिकांच्या मनोरंजनासाठी जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणल्या जात आहेत. दूरदर्शनवर शनिवारपासून "रामायण", "महाभारत", "व्योमकेश बक्षी" आणि "सर्कस" या मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता झी मराठीनेही आपली लोकप्रिय मालिका "स्वराज्यरक्षक संभाजी" पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

First published: March 28, 2020, 10:17 PM IST

ताज्या बातम्या