जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Hardeek Joshi Akshaya Deodhar: राणादा आणि पाठकबाई यांची जोडी सिल्वर स्क्रीनवर, हार्दिक-अक्षया पुन्हा एकत्र

Hardeek Joshi Akshaya Deodhar: राणादा आणि पाठकबाई यांची जोडी सिल्वर स्क्रीनवर, हार्दिक-अक्षया पुन्हा एकत्र

Hardeek Joshi Akshaya Deodhar: राणादा आणि पाठकबाई यांची जोडी सिल्वर स्क्रीनवर, हार्दिक-अक्षया पुन्हा एकत्र

राणादा आणि पाठकबाई यांच्या मालिकेतील केमिस्ट्रीवर तर चाहते फिदा होतेच. आता एका मोठ्या ब्रेकनंतर हे रियल आयुष्यातील कपल एका खास प्रोजेक्टमध्ये दिसून येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 20 जुलै: मालिका क्षेत्रात या जोडीने प्रेक्षकांचं मन जिंकलं असे राणा दा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येताना दिसत आहे. आजपर्यंत टीव्हीवर एकत्र दिसून आलेली ही जोडी मोठ्या पडद्यावर सुद्धा एकत्र दिसून येणार आहे. हार्दिक आणि अक्षया (hardeek joshi and akshaya deodhar) येत्या काळात सिल्वर स्क्रीनवर एकत्र काम करताना दिसणार आहेत. ‘फाईल नंबर 498 अ’ या नव्याकोऱ्या सिनेमात अक्षया आणि हार्दिक एकत्र झळकताना दिसणार आहे. हार्दिक आणि अक्षया हे पहिल्यांदाच एकत्र सिनेमात झळकताना दिसणार आहेत असं सुद्धा समोर येत आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला नुकतीच मुंबई येथे सुरुवात झाल्याचं सुद्धा समोर येत आहे. हार्दिक आणि अक्षया यांच्या जोडीने तुझ्यात जीव रंगला मालिकेतून समोर येत प्रेक्षकांना अक्षरशः वेडं करून टाकलं होतं. या मालिकेने बरीच लोकप्रियता मिळवली तसंच अक्षया आणि हार्दिकच्या म्हणजे राणा दा आणि अंजलीबाईंच्या जोडीचा मोठा चाहतावर्ग सुद्धा तयार झाला. काहीच महिन्यांपूर्वी या ऑन स्क्रीन दिसणाऱ्या कपलने खऱ्या आयुष्यात सुद्धा साखरपुडा करत एकमेकांना जोडीदार म्हणून निवडल्याचं जाहीर केलं होतं. सध्या या ब्युटीफुल कपलला सिनेमात एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. त्यांच्या मालिकेतील पात्रांवर सगळ्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दर्शवलं होतं आणि आता सिनेमात सुद्धा त्यांचं एकत्र काम बघण्यासाठी चाहते आतुर झाल्याचं समोर येत आहे.

जाहिरात

एकमेकांशी असलेलं स्पेशल नातं सोशल मीडियावर जगजाहीर केल्यापासून हार्दिक आणि अक्षया एकमेकांसोबत बराच वेळ एकत्र घालवताना दिसत असतात. तसंच ते एकमेक्नासोबत घालवलेले काही खास क्षण सोशल मीडियावर सुद्धा शेअर करत असतात. हे ही वाचा-  Snehlata Vasaikar: ‘हे म्हातार चळ’, स्नेहलताचा हा फोटो पाहून उडाली सर्वांची झोप सध्या हे कपल लंडनमध्ये असल्याचं सुद्धा दिसून येत आहे. लंडनमध्ये त्यांनी शूट केलेले धमाल रील्स सुद्धा बरेच viral झाले होते. एका मोठ्या काळानंतर हार्दिक आणि अक्षया यांची केमिस्ट्री पुन्हा बघायला मिळणार आहे. सिंमेटही त्यांच्या भूमिकेबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी त्यांचं काम बघण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले असल्याचं कळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात