जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Tunisha Sharma : तुनिषा शर्मावर अंत्यसंस्कार; शेवटचा निरोप देताना कुटुंबियांना अश्रू अनावर

Tunisha Sharma : तुनिषा शर्मावर अंत्यसंस्कार; शेवटचा निरोप देताना कुटुंबियांना अश्रू अनावर

तुनिषा शर्मा अंत्यसंस्कार

तुनिषा शर्मा अंत्यसंस्कार

अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या केली होती. आज अखेर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 डिसेंबर :  टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा नं रविवारी मालिकेच्या सेट आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. वयाच्या 20 व्या तुनिषानं इतकं टोकाचं पाऊल उचलल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज अखेर तुनिषावर मिरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाला अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबिय, नातेवाईक तसंच सिनेक्षेत्रातील कलाकारांनी उपस्थिती लावली होती. टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या केली होती. आज म्हणजेच 27 डिसेंबर 2022 रोजी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाने तिचा सहकलाकार शीझान खानसोबतच्या ब्रेकअपमुळे आत्महत्या केली केल्याचं म्हटलं जात आहे. ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या शोच्या सेटवर तिने मृत्यूला कवटाळले. आज अखेर तिच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. यावेळी तिच्या जवळच्या व्यक्ती उपस्थित होत्या. 25 डिसेंबर 2022 रोजीच तुनिषाचा अंत्यसंस्कार होणार होता, परंतु अभिनेत्रीची मावशी मुंबईत पोहोचू शकली नव्हती. आता कुटुंबाने एक निवेदन जारी करून लोकांना कळवले होते की, तुनिषावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांनी सांगितले होते  कि, ‘‘आमची प्रिय तुनिषा शर्मा. अत्यंत दुःखाने कळवावे लागते की, तुनिषा शर्मा 24 डिसेंबर 2022 रोजी आम्हाला सोडून गेली. आज तिला अखेरचा निरोप दिला जाणार आहे. तिच्या अंत्यसंस्कारासाठी तुम्ही सर्वांनी यावे अशी आमची इच्छा आहे. मीरा रोड येथे दुपारी 3 वाजता तुनिषावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.’’ हेही वाचा - Tunisha Sharma:12 वर्षीच मिळाला पहिला पे-चेक तर टेबलाखाली सापडलं पहिलं प्रेमपत्र; असं होतं तुनिषाचं आयुष्य

जाहिरात

याचदरम्यान तुनिषाच्या आईचा एक व्हिडीओ समोर आला होता. तुनिषाला पाहताच तिची आई मात्र बेशुद्ध पडली. रुग्णालयामधून बाहेर येतानाचा तुनिषाच्या आईच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुनिषाच्या घरातील इतर मंडळी तिच्या आईला रुग्णालयामधून बाहेर आणत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. आता तिच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

तर तिच्या मृत्यूप्रकरणात समोर आलेला आरोपी शीजानला सध्या 28 डिसेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अनेक अंगांनी तपास करत आहेत. तुनिषा शर्माने 2013 मध्ये प्रीमियर झालेल्या भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप या चित्रपटातील भूमिकेने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक टीव्ही शोमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, तिने फितूर, बार बार देखो आणि कहानी 2 या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात