अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर मेकअप रूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या दु:खद बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मृत्यूच्या अवघे 6 तास आधी तुनिषाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे आणि फोटोमध्ये तिने मोटिव्हेशनल मेसेज लिहिला आहे.
तुनिशा शर्माचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती सेटवर मेकअप करताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला मेकअप आणि हेअरस्टाइलची संपूर्ण टीम आहे. शूटिंगपूर्वी ती तयार होत आहे, तसेच टीमशी संवाद साधत आहे.
तुनिषाने अवघ्या 20 वर्षात यशाचे शिखर गाठले होते. तीने लहानपणीच अभिनयाच्या दुनियेतपाऊल ठेवलं होतं. तुनिषाला अवघ्या 12 वर्षात पहिला पे-चेक मिळाला होता.
तसेच तिने एका मुलाखतीत पहिल्या प्रेमपत्राची आठवण सांगितली होती. ती म्हणाली होती, 'आमच्यात काहीही झाले नसले तरी मला त्याचे प्रेमपत्र अजूनही आठवते.'
4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये जन्मलेल्या तुनिषाने सोनी टीव्हीच्या सीरियल 'महाराणा प्रताप'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.
कतरिना कैफ स्टारर 'फितूर' या चित्रपटात कतरिनाच्या बालपणीची भूमिका साकारून तुनिषाने बरीच प्रशंसा मिळवली.
टीव्ही सीरियलशिवाय तुनिषाने फितुर, बार बार देखो, कहानी-2 दुर्गा राणी सिंग आणि दबंग-3 या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. तसेच कतरिनाच्या बार बार देखो या चित्रपटात त्याने कतरिना कैफच्या बालपणीची भूमिका साकारली होती.