जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sheezan Khan: शीझान खानची सुटका नाहीच; नव्या खुलाशानंतर पोलीस कोठडीत पुन्हा वाढ

Sheezan Khan: शीझान खानची सुटका नाहीच; नव्या खुलाशानंतर पोलीस कोठडीत पुन्हा वाढ

शीझान खान

शीझान खान

शीझान खानची पोलीस कोठडी 30 डिसेंबरला संपणार होती पण आता याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार शीझानच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 डिसेंबर :  तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. गुरुवारी पोलिसांनी टीव्ही अभिनेत्री तुनिषाची आई वनिता शर्मा, मामा पवन शर्मा आणि मोलकरणीची चौकशी केली. शीझान खान अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा मोठा आरोप आई वनिताने केला होता. मोलकरणीने सांगितले की, शीझान -तुनिषा एकमेकांच्या घरी जात असत. त्याने अभिनेत्रीला लग्नाचे वचनही दिले होते. शीझान खानची पोलीस कोठडी ३० डिसेंबरला संपणार होती पण आता याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार शीझानच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. शीझान खानची पोलीस कोठडी 30 डिसेंबरला संपणार होती. पण तुनिषाच्या आईने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली असून शीझानची चौकशी करायची असल्याने त्याला अजून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिचा प्रियकर आणि को-स्टार शीझान खानच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. आदल्या दिवशी तुनिषाच्या आईने शीझानवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता. याशिवाय शीझानवर तुनिषावर हल्ला केल्याचाही आरोप आहे. हेही वाचा - Shreyas Talpade Wife: पहिल्याच भेटीत कॉलेज सेक्रेटरीच्या प्रेमात पडला श्रेयस; फारच फिल्मी आहे दोघांची लव्हस्टोरी कोर्टाने शीझानला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असली तरी त्याचे कुटुंबीय लवकरच याप्रकरणी जामीन अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत अभिनेत्याचे कुटुंबीय कागदोपत्रांची तयारी करत आहेत. आज कोर्टात तुनिषाच्या वकिलांनी ‘शीझान खान तिला उर्दू शिकवू लागला. तर तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती. एवढाच नाही तर शिझानने तुनिषावर हात देखील उचलला होता.’ असं सांगितलं. तसेच ‘शीझानने तिला लग्नाचं वचन  दिलं होतं . पण त्यासाठी तो तिच्यावर धर्म बदलण्याची जबरदस्ती करत होता. तसेच त्याच्या बहिणीने तुनिषाला दर्ग्यातही नेले होते.’ तुनिषाच्या आईने केलेल्या या दाव्यामुळे सगळीकडे खळबळ माजली होती. याच दाव्याला धरून सरकारी वकिलांनी चौकशीसाठी शीझानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. चौकशीदरम्यान शीझान त्याचा ईमेल आयडी आणि इतर पासवर्ड उघड करत नाही.

News18लोकमत
News18लोकमत

या प्रकरणी शीझानच्या वकिलाचे म्हणणे आहे की, मोबाईल जप्त केला आहे, मग त्याला ताब्यात ठेवण्याची काय गरज आहे.’ याप्रकरणी आतापर्यंत 27 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. याप्रकरणी शीझान सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, चॅटबाबत त्याची सतत चौकशी केली जात आहे. आता या नवीन खुलाश्याने सगळीकडे खळबळ माजली असून सत्य लवकरच समोर येईल अशी आशा तुनिषाच्या चाहत्यांना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: tv actor
  • First Published :
जाहिरात
जाहिरात