जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / शिझानने तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला...; तुनिषाच्या आईच्या दाव्याने खळबळ

शिझानने तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला...; तुनिषाच्या आईच्या दाव्याने खळबळ

तुनिषा शर्मा

तुनिषा शर्मा

तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध खुलासे केले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 डिसेंबर : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने नुकतीच आत्महत्या केली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता तुनिषा आईने पुन्हा एकदा शीझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध खुलासे केले आहेत. त्यांच्या या दाव्याने खळबळ निर्माण झाली आहे. काल  तुनिषाच्या आईने सांगितले होते कि शीझान खानला ड्रग्जचे व्यसन होते. तो ड्रग्ज घेत असे. तुनिषा शर्माच्या आईनेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भेटीदरम्यान शीझान खानला भेटल्यानंतर ती पूर्णपणे बदलल्याचा खुलासा केला होता. तसेच ‘शीझान खान तिला उर्दू शिकवू लागला. तर तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती. हळूहळू शीजान खानमुळे तुनिषा शर्मा तिच्या आईपासूनही दूर जाऊ लागली.’ असा खुलासा तुनिषाच्या आईने केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत तुनीषाची आई म्हणाली कि, ‘माझ्या मुलीला शिझानची आई त्रास देत होती, त्या सगळ्यांनी माझ्या मुलीला काबू केलं होतं . शिझानने तिला लग्नाचं वचन  दिलं होतं . पण त्यासाठी तो तिच्यावर धर्म बदलण्याची जबरदस्ती करत होता. तसेच त्याच्या बहिणीने तुनिषाला दर्ग्यातही नेले होते.’ तुनिषाच्या आईने केलेल्या या दाव्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. आता या प्रकरणाला पुन्हा लव्ह जिहादचे वळण लागण्याची शक्यता आहे. हेही वाचा - Tunisha Sharma case : ‘शीझानला ड्रग्जचे व्यसन…’; तुनिषाच्या आईच्या खुलाश्याने प्रकरणाला नवं वळण त्यासोबतच तुनिषाची आई म्हणाली, ‘त्याच्या आईने तुनीषाला घरात कुत्रा पाळण्याची जबरदस्ती केली होती. मी कुत्र्याला घाबरते तरीही त्यांच्या सांगण्यावरून तुनीषाने घरात कुत्रा पाळला होता. एवढाच नाही तर शिझानने तुनिषावर हात देखील उचलला होता. असा दावा तिच्या आईने केला आहे. शीझान खानच्या फोनवरील व्हॉट्सअॅप चॅटमुळे संपूर्ण सत्य समोर येईल, असा दावा तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी केला आहे. इंडिया टीव्हीशी बोलताना वनिता म्हणाली, ‘तुनिषा तिच्या ब्रेकअपनंतरही शोमध्ये काम करत होती. यामध्ये शीझान खानच्या आईचाही समावेश आहे. तुनिषाने त्याच्या वाढदिवसानिमित्त शीझानचे घर सजवले होते. त्याने तिच्यासाठी महागड्या भेटवस्तू खरेदी केल्या. मला समजत नव्हतं नक्की काय चाललंय. तिने हिजाब परिधान केला होता. ती हळूहळू त्यांचा धर्म स्वीकारत होती. शीजन आणि तिच्या कुटुंबाशी तिची जवळीक वाढली होती. माझी मुलगी अशी कधीच नव्हती. माझी मुलगी दुसर्‍या धर्माची आहे हे नातं सुरू करण्यापूर्वीच त्याला माहीत होतं. शीजानची आई तिला फोन करून त्रास देत असल्याचे तुनिषाने सांगितले. मी शीजनच्या आईशीही बोललो, पण तिने साफ नकार दिला.

News18लोकमत
News18लोकमत

तुनिषाचे मामा पवन शर्मा यांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा अभिनेत्री शीजनसोबत रिलेशनशिपमध्ये आली तेव्हा तिची जीवनशैली बदलली. तिने उर्दू शिकायला सुरुवात केली होती आणि हिजाब देखील घालायला सुरुवात केली होती.आता या नवीन खुलाश्याने सगळीकडे खळबळ माजली असून सत्य लवकरच समोर येईल अशी आशा तुनिषाच्या चाहत्यांना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात