मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /श्रद्धा वालकर प्रकरणामुळे आम्ही...; तुनिषाच्या बॉयफ्रेंडचा ब्रेकअपबाबत खळबळजनक खुलासा

श्रद्धा वालकर प्रकरणामुळे आम्ही...; तुनिषाच्या बॉयफ्रेंडचा ब्रेकअपबाबत खळबळजनक खुलासा

तुनिषा शर्मा

तुनिषा शर्मा

तुनिषाच्या बॉयफ्रेंडला अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान शिझाननं मोठा खुलासा केला आहे. दोघांच्या ब्रेकअपचं धक्कादायक कारण त्यानं सांगितलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 डिसेंबर : टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्मानं मालिकेच्या सेटवर गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. तुनिषा अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती आणि त्यातून तिनं आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिचा बॉयफ्रेंड शिझान खान याला पोलिसांनी अटक केली आहे. तुनिषाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधी दोघांचा ब्रेकअप झाला होता. ब्रेकअपमुळे तुनिषा प्रचंड खचली होती आणि त्यामुळे आत्महत्येचा मोठा निर्णय घेतला, असा आरोप तिच्या आईनं केला. तुनिषाच्या बॉयफ्रेंडला अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान शिझाननं मोठा खुलासा केला आहे. दोघांच्या ब्रेकअपचं धक्कादायक कारण त्यानं सांगितलं आहे.

तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान यानं पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, 'दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे मी अस्वस्थ झालो होतो. त्यानंतर मी तुनिषाबरोबर ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. आपलं एकमेकांवर प्रेम असलं तर आपल्यात धर्म आड येणार हे मी तुनिषाला सांगितलं होतं आणि त्यानंतर तिच्याबरोबर ब्रेकअप केला. तसंच मी तिला हेही सांगितलं होतं की, आपल्यात वयाचं अंतरही खूप. ही दोन्ही कारण सांगून मी तिच्याबरोबर ब्रेकअप केला होता'.

हेही वाचा - Sheezan Khan : तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला, तेव्हा...; शीझान खानचा पोलिसांसमोर खुलासा

'त्याचप्रमाणे तुनिषानं ब्रेकअपनंतरही काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता तेव्हा मी तिला वाचवलं होतं. मी तिच्या आईला भेटलो होतो. तुमच्या मुलीवर लक्ष ठेवा आणि तिची काळजी घ्या असंही मी त्यांना सांगितलं होतं',असं शिझाननं सांगितलं.

तुनिषाच्या आईनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझानवर गंभीर आरोप केलेत. त्यांनी म्हटलं, 'मी मीडियावाल्यांना सांगू इच्छिते की, शीझानने तुनिषाला धोका दिला. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आला. लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत ब्रेकअप केलं. दुसऱ्या मुलीसोबत असतानाही त्याने तुनिषासोबत संबंंध ठेवले. तिचा वापर केला. मला एवढंच म्हणायचंय की, शीझानला शिक्षा झाली पाहिजे. मी माझी मुलगी गमावली आहे. मीडियाही खूप सपोर्ट करत आहे त्यांंचही धन्यवाद'.

तुनिषानं 2013मध्ये 'भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप' या सिनेमातून तिनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेकशोमध्ये कामं केली. तसंच फितूर, बार बार देखो आणि कहानी 2 सारख्या सिनेमात तिनं काम केलीत.

First published:

Tags: Sucide, Sucide case, Tv actor