मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शीझानने लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत...; तुनिषाच्या आईचे अभिनेत्यावर गंभीर आरोप

शीझानने लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत...; तुनिषाच्या आईचे अभिनेत्यावर गंभीर आरोप

तुनिषा शर्मा

तुनिषा शर्मा

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यापासून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 डिसेंबर : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यापासून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीने अवघ्या 20 व्या वर्षी हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुनिषाने आत्महत्या का केली असावी याविषयी अनेकजण तर्क वितर्क लावत आहेत. पोलिसांचीही याप्रकरणी चौकशी सुरु असून रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच तुनिषाचा आईचा एख व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये तुनिषाच्या आईने शीझान खानवर अनेक आरोप केले आहेत.

तुनिषाच्या आईचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तुनिषाच्या आईने शीझान आणि तुनिषाच्या नात्याविषयीही खुलासा केलाय. व्हिडीओमध्ये तुनिषाची आई म्हणाली, 'मी मीडियावाल्यांना सांगू इच्छिते की, शीझानने तुनिषाला धोका दिला. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आला. लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत ब्रेकअप केलं. दुसऱ्या मुलीसोबत असतानाही त्याने तुनिषासोबत संबंंध ठेवले. तिचा वापर केला. मला एवढंच म्हणायचंय की, शीझानला शिक्षा झाली पाहिजे. मी माझी मुलगी गमावली आहे. मीडियाही खूप सपोर्ट करत आहे त्यांंचही धन्यवाद'.

शीझान आणि तुनिषा काही काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. तुनिषाच्या मृत्याआधी काही दिवस त्यांचं ब्रेकअप झालं होतं. यामुळे अभिनेत्री तणावात होती. याच तणावातून अभिनेत्रीनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधूनही कुठलीही बळजबरी झाल्याची चिन्ह नाहीयेत. पोलीस याप्रकरणी आणखी माहितीचा शोध घेत आहेत.

तुनिषा शर्माने 2013 मध्ये प्रीमियर झालेल्या भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप या चित्रपटातील भूमिकेने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक टीव्ही शोमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, तिने फितूर, बार बार देखो आणि कहानी 2 या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

First published:

Tags: Sucide, Tv actor, Tv actress