जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sheezan Khan : तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला, तेव्हा...; शीझान खानचा पोलिसांसमोर खुलासा

Sheezan Khan : तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला, तेव्हा...; शीझान खानचा पोलिसांसमोर खुलासा

शीझान खान

शीझान खान

टीव्ही मालिका अलिबाबा अभिनेत्री तुनिषा शर्माने टीव्ही सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा को-स्टार शीझान खानला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 डिसेंबर : टीव्ही अभिनेत्री  तुनिषा शर्मा च्या आत्महत्येच्या बातमीने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. टीव्ही मालिका अलिबाबा अभिनेत्री तुनिषा शर्माने टीव्ही सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा को-स्टार शीझान खानला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तुनिषाच्या मृत्यूने तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. तुनिषाने हे टोकाचं पाऊल का उचललं असावं याविषयी अनेक अपडेट समोर येत आहे. अशातच तुनिषा प्रकरणात शीझान खाननें मोठा खुलासा केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शीझान मोहम्मद खान यानं चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी शीझाननं तिला वाचवलं. शीझाननं याविषयी तिच्या आईलाही सांगितलं होतं. हेही वाचा -  Tunisha Sharma Death Case : तुनिषाचा मृत्यू आणि लव्ह जिहादच्या अँगलवर पोलिसांचा मोठा खुलासा, म्हणाले… टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली असून तिच्या आकस्मिक मृत्यूमुळे सर्वजण चिंतेत आहेत. तुनिषा शर्मानं असं का केलं हाच प्रश्न सर्वांच्या मनात येत आहे. दुसरीकडे, तुनिषाच्या मृत्यूनंतर, तुनिषाच्या आईनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शीझानची याप्रकरणी पोलीस आणखी चौकशी करत आहेत. शीझान आणि तुनिषा काही काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. तुनिषाच्या मृत्याआधी काही दिवस त्यांचं ब्रेकअप झालं होतं. यामुळे अभिनेत्री तणावात होती. याच तणावातून अभिनेत्रीनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधूनही कुठलीही बळजबरी झाल्याची चिन्ह नाहीयेत. पोलीस याप्रकरणी आणखी माहितीचा शोध घेत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

टीव्ही सीरियलशिवाय तुनिषाने फितुर, बार बार देखो, कहानी-2 दुर्गा राणी सिंग आणि दबंग-3 या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. फितुर आणि बार बार देखो मध्ये तुनिषाने लहान कतरिना कैफची भूमिका निभावली होती. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या दबंग-3 मध्येही तुनिषाने छोटी भूमिका केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात