Home /News /entertainment /

TRP Alert: इंद्रा दीपू TRPच्या शर्यतीतून बाहेर! या आठवड्यात दिपासह मारली 'या' मालिकेनं बाजी

TRP Alert: इंद्रा दीपू TRPच्या शर्यतीतून बाहेर! या आठवड्यात दिपासह मारली 'या' मालिकेनं बाजी


TRP Alert: इंद्रा दीपू TRPच्या शर्यतीतून बाहेर! या आठवड्यात दिपासह मारली 'या' मालिकेनं बाजी

TRP Alert: इंद्रा दीपू TRPच्या शर्यतीतून बाहेर! या आठवड्यात दिपासह मारली 'या' मालिकेनं बाजी

TRPच्या शर्यतीत टॉपवर येण्यासाठी मालिकेत एकाहून एक सॉलिड ट्विस्ट आणले जात आहेत. मात्र तरीही मालिका TRP च्या शर्यतीत मागे पडल्याचं दिसून आलं आहे.

  मुंबई, 23 जून: टेलिव्हिजनवरील मालिकांनी प्रेक्षकांच्या मानवर राज्य केलं आहे. प्रत्येक वाहिनीवर वेगळ्या विषयाच्या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. TRPच्या शर्यतीत टॉपवर येण्यासाठी मालिकेत एकाहून एक सॉलिड ट्विस्ट आणले जात आहेत. मात्र तरीही मालिका TRP च्या शर्यतीत मागेच असल्याचं दिसून येतं. या आठवड्यातील TRP रेटिंग समोर आलं असून प्रेक्षकांची लाडकी मालिका मन उडू उडू झालं ( Man Udu Udu Jhal) टीआरपीच्या शर्यतीतून बाहेर आली आहे. इंद्रा दीपूच्या ( Indra-Deepu) लव्ह स्टोरीमध्ये आणलेला ट्विस्ट काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला नाही. तर रंग माझा वेगळा ( Rang Majha Vegla) ही मालिका याही आठवड्यात टॉप वन वर आहे.  रंग माझा वेगळा ही मालिका या आठवड्यात 6.7 टीआरपी रेटींगसह टॉप वनवर आहे. तर गेली अनेक दिवस मागे पडलेली सुख म्हणजे नक्की काय असतं ( Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिका यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. मालिकेला 6.6 रेटींग मिळालं आहे. जय आणि गौरीच्या आयुष्यात आलेला ट्विस्ट प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.   मालिकेनं आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला मागे टाकलं आहे.  आई कुठे काय करते ही मालिका 6.4 रेटींगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.  तर चौथ्या क्रमांकावर फुलाला सुंगध मातीचा ( Phulala Sugandh Maticha) ही मालिका आहे. कीर्ती आणि शुभम यांची नवी गोष्ट 6.1 रेटींगसह चौथ्या क्रमांकावर आहे.  तर ठिपक्यांची रांगोळी ( Thipkyanchi Rangoli) ही मलिकाही पहिल्या पाचात आली असून मालिकेला 6.0 इतके टीआरपी रेटिंग मिळाले आहेत. हेही वाचा - 'किचन कल्लाकार'च्या मंचावर राजकीय तडका! आठवलेंचा अजित दादांना सूचक सल्ला
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  यावेळी देखील यश नेहाची मालिका मागे पडली असून मालिका सातव्या क्रमांकावर आहे. लग्नाचा इतका मोठा महाएपिसोड दाखवूनही  मालिका 5.6 रेटींगसह सातव्या क्रमांकावर आली आहे. त्याचप्रमाणे5.5 रेटींगसह माझी तुझी रेशीमगाठ ( Majhi Tujhi Reshimgath) हीच मालिका आठव्या क्रमांकावर आहे तर नवव्या क्रमांकावर पुन्हा एकदा सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आहे. तर यावेळी स्वाभिमान ( Swabhiman) ही मालिका या आठवड्यात चक्क दहाव्या क्रमांवर गेली आहे.  शांतनू पल्लवीच्या लग्नानंतर मालिकेत आलेला ट्विस्ट प्रेक्षकांच्या काही पसंतीस उतरलेला दिसत नाही. मागील एक महिन्यांपासून रंग माझा वेगळा ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर आई कुठे काय करते दुसऱ्या क्रमांकावर. दोन्ही मलिकांमध्ये दर आठवड्याला टाकेकी टक्कर पाहायला मिळत होती. मात्र आठवड्यात TRPच्या रेटींगची सगळी गणिती बदलली आहेत. मन उडू उडू झालं ही मालिका गेली अनेक दिवस दहाव्या क्रमांकावर होती या आठवड्यात मात्र मालिका TRP रेटींगमधून बाहेर गेली आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Tv celebrities, Tv serial, Tv shows

  पुढील बातम्या