मुंबई, 23 जून : झी मराठीवर (Zee Marathi) प्रदर्शित होणारा 'किचन कल्लाकार' कार्यक्रम (Kitchen kalakar) खूप प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाचे एपिसोड प्रेक्षक आठवणीने आणि उत्सुकतेनं पाहत असतात. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज या कार्यक्रमात हजेरी लावतात आणि या कार्यक्रमातील जेवण बनवणे, खेळ खेळणे आणि गप्पागोष्टींमध्ये सहभाग घेतात. त्यामुळे या कार्यक्रमाला आणखीनंच चारचांद आलेले पहायला मिळतात. अशातच या कार्यक्रमाचा नवा रंजक भाग पहायला मिळणार असल्याचं पहायला मिळतंय. झी मराठीनं याविषयीचा एक प्रोमो प्रदर्शित केलं आहे.
किचन कल्लाकारच्या नवीन भागात रामदास आठवले यांनी हजेरी लावली आहे. आठवले म्हटल्यावर मस्ती, धमाल, कविता हे पहायला मिळणारच. मात्र त्यापेक्षाही जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे त्यांच्या वक्तव्याची. 23 तारखेला होणाऱ्या एपिसोडमध्ये रामदास आठवले अजित दादांविषयी (Ajit Pawar) एक कविता करताना दिसणार आहेत आणि दादांना सल्लाही देणार आहेत. या प्रोमेमध्ये रामदास आठवलेंचा वेगळाच अंदाज पहायला मिळत आहे.
हे ही वाचा -अभिनेता सुबोध भावेचं आवडतं गाव माहितीय का? तिथेच करतोय नव्या सिनेमाचं शुटींग
प्रमोमध्ये आठवलेंना अजित दादांचा फोटो दाखवला जातो. फोटो पाहून आठवले लगेच कविता करतात. 'जे करतात अनेकवेळा वादा...अन् पूर्ण करत नाही ते अजित दादा', अशी अजित दादांची ओळख करुन देताना आठवले पहायला मिळतात. त्यानंतर त्यांना अजित दादांना काय सल्ला देणार?, विचारलं असता यावर आठवले म्हणाले की, मी दादांना एकच सल्ला देणार आहे. शिवसेनेला दिलेला पाठिंबा त्यांनी लगेच काढून घ्यावा. त्यांनी पाठिंबा काढला की आम्ही बीजेपी वाले...देवेंद्र फडणवीस तयारच बसलेलो आहेत.
दरम्यान, 23 जूनला 9.30 वा. रामदास आठवलेंची विनोदी शैली आपल्याला झी मराठीवर पहायला मिळणार आहे. रामदास आठवलेंच्या खास शैलीतील विनोदी कविताही आपल्याला पहायला मिळणार आहे. रामदास आठवलेंसोबत त्यांच्या पत्नी झळकणार आहे. त्यामुळे थोडा राजकीय आणि भरपूर मनोरंजनाचा तडका आपल्याला पहायला मिळणार आहे.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.