मुंबई 9 एप्रिल**:** प्रसिद्ध गायक टोनी कक्करचं (Tony Kakkar) शोना शोना (Shona Shona Song) हे गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या गाण्यात बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल झळकले होते. त्यामुळं या गाण्यानं आल्पावधितच लोकप्रियतेचं शिखर गाठलं. परंतु हे गाणं पाहून काही चाहते नाराज देखील झाले आहेत. या गाण्यामध्ये उच्चारलेल्या शब्दांवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. (Plea Filed in HC) या गाण्याद्वारे समाजात अश्लीलता पसरवली जात आहे असा आरोप करुन त्यांनी गाण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. नेहा कपूर आणि मोहीत भाडू या दोघांनी टोनी कक्करच्या गाण्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या गाण्यांद्वारे समाजात अश्लीलता पसरवली जात आहे. देशभरातील मुलांवर चुकीचे संस्कार होत आहेत. त्यामुळं या गाण्यांवर त्वरित बंदी घालावी. शिवाय YouTube, Gaana.com, Instagram, TV and Radio या माध्यमांनी देखील अशा प्रकारच्या अश्लील गाण्यांचा प्रचार करु नये अशी विनंती त्यांनी या याचिकेद्वारे केली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाला देखील त्यांनी एक पत्र पाठवलं आहे. या याचिकेमुळं टोनी कक्करचं गाणं पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. अवश्य पाहा - ‘ही बाई कायम रागात असते’; चाहत्याला धक्का मारणाऱ्या जया बच्चन झाल्या ट्रोल
अवश्य पाहा - Jaya Bacchan यांच्या या कृतीमुळं रेखा आणि बिग बींचं नातं तुटलं टोनी कक्कर हा प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा भाऊ आहे. गेल्या काही काळात तो आपल्या म्यूझिक अल्बममुळं प्रकाशझोतात आला आहे. ‘धिमे धिमे’, ‘कोका कोला’, ‘कुर्ता पयजामा’, ‘चॉकलेट’, ‘बुटी शेक’ यांसारख्या गाण्यांमुळं तो चर्चेत असतो. त्याच्या गाण्यांवर अनेकदा टीकाही केली जाते. त्याच्या गाण्यांना काहीच अर्थ नसतो. किमान एक कडवं तरी पूर्ण लिहित जा. अशा आशयाचे कॉमेंट्स काही नेटकरी त्यांच्या गाण्यांवर देतात. अनेकदा काही नामांकित संगीतकारांनी देखील त्याच्या गाण्यांवर जोरदार टीका केली आहे.