मुंबई 9 एप्रिल: जया बच्चन (Jaya Bachchan) या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. चित्रपटांसोबतच त्या राजकारणातही सक्रिय आहेत. त्यामुळं त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळं अनेकदा राजकीय वादंग निर्माण होतं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणूकीची रणधूमाळी सुरु आहे. (West bengal election) अन् या रणधुमाळीत जया बच्चन TMC पक्षासाठी प्रचार करताना दिसत आहेत. अलिकडेच त्यांनी एका प्रचार रॅलीतही भाग घेतला होता. मात्र या रॅलीत त्यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चाहत्याला धक्का मारुन खाली ढकललं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळं जया बच्चन यांना ट्रोल केलं जात आहे.
Jaya Bachchan is always in a bad mood pic.twitter.com/hxqMfoW9iL
— Swati Goel Sharma (@swati_gs) April 8, 2021
अवश्य पाहा - Jaya Bacchan यांच्या या कृतीमुळं रेखा आणि बिग बींचं नातं तुटलं जया बच्चन ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत आहेत. मात्र या प्रचार रॅली त्यांच्या अगलट आल्या आहेत. त्यांनी सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला धक्का मारुन खाली ढकलंल्यामुळं सध्या त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ही खडूस बाई कायम रागातच असते. जनतेशी संपर्क ठेवायचा नाही तर प्रचारसभेत येताच का? ही बाई कायम लोकांचा अपमान करते अशा आशयाचे ट्विट करुन संतापलेले नेटकरी सध्या जया बच्चन यांना ट्रोल करत आहेत. या ट्रोलिंगवर जया बच्चन यांनी अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अवश्य पाहा - वडिलांच्या ‘या’ अटीमुळं मोडणार होतं Big B आणि Jaya Bacchan यांचं लग्न
How rude #JayaBachchan pic.twitter.com/YOZsn74f04
— exsecular (@ExSecular) April 8, 2021
No wonder why Didi chooses arrogant & rude ppl like #JayaBachchan for campaign as TMC is all about misbehaving,arrogance & rudeness.Ppl open ur eyes & brain before voting such party.
— Vandana Gupta 🇮🇳 (@im_vandy) April 8, 2021
& don't know y ppl want selfies such so called arrogant celebs. pic.twitter.com/cpVNWJabia
पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यात आज 31 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. दक्षिण 24 परगना जिल्ह्यामध्ये (भाग 2) 16 जागांवर, हावडा (भाग 1) येथे सात जागांव आणि हुगळी (भाग 1) येथील आठ जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानाच्या वेळेस करोनासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी केली जात असून तापमान तपासूनच मतदारांना मतदानासाठी प्रवेश दिला जातोय.