मुंबई, 02 मे : टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलं आहे. यातील एक लोकप्रिय पात्र म्हणजे रीता रिपोर्टर. रीता रिपोर्टर प्रेक्षकांमध्ये चांगली प्रसिद्ध आहे. रीता म्हणजेच अभिनेत्री प्रिया अहुजा सध्या फॅमिलीबरोबर व्हॅकेशन मोडवर आहे. पती आणि मुलाबरोबर वेळ घालवत आहे. रीताचा एक व्हिडीओ समोर आलाय ज्यात ती पतीबरोबर लिपलॉक करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. प्रियाने कामातून ब्रेक घेऊन छान निसर्गरम्य ठिकाणी जाऊन सुट्ट्या घालवण्याचं ठरवलं. रीतानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पतीबरोबर समुद्र किनाऱ्यावरून चालतान दिसतेय. चालत असताना दोघे मध्येच लिपलॉक किस करतात. त्यांचा हा रोमँटिक क्षण कॅमेरात कैद करण्यात आलाय. हेही वाचा - Meta Gala 2023 मध्ये आलिया भट्टचा डेब्यू! तर प्रियांकाची नवऱ्याबरोबर दमदार एंट्री
त्याचप्रमाणे रीताने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती नवऱ्याबरोबर रोमँटिक झाली आहे. समुद्राच्या एका किनाऱ्यावर दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहेत आणि किस करत आहेत. किस करताच मुलगा धावत त्यांच्याकडे येतो. मुलगा आल्यानं त्यांच्या मुड स्पॉइल झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रिया मजेदार कॅप्शन दिलंय. “पॅरेंट्स; लेट्स डू रेमँटिक हॉलिडे, किड्स: LOL” असं कॅप्शन तिनं व्हिडीओला दिलं आहे.
रीता रिपोर्टर या भूमिकेनं अभिनेत्री प्रियाला ओळख मिळाली. यामागे तिच्या नवऱ्याचा खूप मोठा हिस्सा आहे. तारक मेहताचा दिग्दर्शक मालव राजदा आणि प्रिया यांचं प्रेम तारक मेहताच्या सेटवरच जुळलं. नवरा दिग्दर्शक आणि बायको शोमधील अभिनेत्री. पण दोघांनीही त्यांची लव्ह लाइफ आणि पर्सनल लाइफ नेहमीच वेगळी ठेवली. दोघांना एक मुलगाही झाला आहे. काही महिन्यांआधीच मालव राजदानं तारक मेहता हा शो सोडला.