मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ganapath : टायगर- क्रितीची कमाल अॅक्शन! टीजरमुळे वाढली उत्सुकता, कधी दिसणार सिनेमागृहात?

Ganapath : टायगर- क्रितीची कमाल अॅक्शन! टीजरमुळे वाढली उत्सुकता, कधी दिसणार सिनेमागृहात?

टायगर श्रॉफ (Tiger Shroff)  आणि क्रिती सेननचे (Kriti Sanon) चाहते 2022 मध्ये रिलीज होणार्‍या 'गणपथ: पार्ट 1' बद्दल खूप उत्सुक आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीजर रिलीज केला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 24 डिसेंबर- टायगर श्रॉफ (Tiger Shroff)  आणि क्रिती सेननचे (Kriti Sanon) चाहते 2022 मध्ये रिलीज होणार्‍या 'गणपथ: पार्ट 1' बद्दल खूप उत्सुक आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीजर रिलीज केला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'गणपथ' हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर 23 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टायगर श्रॉफचा अ‍ॅक्शनने भरलेला 'गणपथ'

चित्रपट निर्माते शक्य तितका हा सिनेमा भव्य बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. वासू भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'गणपथ' या थ्रिलर चित्रपटात टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननचा कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहेत. टीजरवरून हे स्पष्ट झाले आहे की यात हाय-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्स दिसणार आहेत. ज्यासाठी आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकांची मदत घेण्यात आली आहे.

वाचा-VIDEO: कपिल शर्माने स्वतःला म्हटलं गरीब; तर शाहिद कपूरने दिलं कडक उत्तर

45 सेकंदांच्या टीजरमध्ये टायगर वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये टायगर त्याच्या अ‍ॅक्शन मूव्ह दाखवताना दिसत आहेत. या टीजरवर नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण याला 'बागी 4' म्हणत आहेत, तर काहीजण टायगरच्या अ‍ॅक्शन आणि पाहून थक्क झाले आहेत.

वाचा-शाहरुख खानने सुरु केलं 'Tiger 3' चं शूटिंग; किंग खानचा जबरदस्त LOOK VIRAL

लंडनमध्ये 'गणपथ'च्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग झाले पूर्ण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायगर आणि क्रितीने लंडनमध्ये 'गणपथ'च्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. दोघांनी एक महिन्यापूर्वी यूकेमध्ये याचे शूटिंग सुरू केले होते. चित्रपटाची टीम आपला उत्साह लपवू शकत नाही. असा दावा केला जात आहे की, हा असा अनोखा थ्रिलर चित्रपट आहे, जो भारतीय चित्रपटसृष्टीत यापूर्वी कधीही दाखवला गेला नाही.

'गणपथ : भाग 1'मध्ये टायगर श्रॉफ झाला आहे बॉक्सर

टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांनी 2014 मध्ये 'हिरोपंती' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता दोघही त्यांच्या दुसऱ्या चित्रपटातून पडद्यावर आपली झलग दाखवण्यासाठी सज्ज झाला आहेत. 'गणपथ : भाग 1'मध्ये एली अवरामही खास भूमिकेत आहे. पिंकविलाने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले होते की, चित्रपट निर्मात्यांनी टायगरच्या वडिलांच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क साधला होता. या चित्रपटात टायगरने बॉक्सरची भूमिका साकारली होती.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Tiger Shroff