मुंबई, 24 डिसेंबर- 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांनी हजेरी लावली आहे. शोच्या प्रोमोमध्ये शोचा होस्ट कपिल शर्मा (Kapil Sharma) या जोडीसोबत धम्माल करताना दिसत आहे. या कॉमेडी शोमध्ये धमाल-मस्ती तर होतेच.परंतु मुख्य हेतू उपस्थित कलाकारांच्या चित्रपटाचं प्रमोशन हे असतं. अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या आगामी चित्रपटांचं प्रमोशन करताना दिसून येतात. यावेळी शाहिद आणि मृणाल ठाकूर आपल्या 'जर्सी' (Jersey) चं प्रमोशन करण्यासाठी आले आहेत.
नुकताच या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये मृणालला पाहून कपिल म्हणतो, 'गेल्या वेळी जेव्हा तू आली होतीस. तेव्हा तू स्वतः साठी एक मुलगा शोधायला सांगितलं होतस. परंतु तू फिरून.. फिरून पुन्हा इथेच माझ्या जवळ आलीस. मी याचा काय अर्थ घेऊ? असं म्हणत कपिल मृणाल ठाकूरशी चेष्टा मस्करी करताना दिसून येत आहे.
View this post on Instagram
शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर या वीकेंडला त्यांच्या आगामी 'जर्सी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचणार आहेत. शोच्या प्रोमोमध्ये कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम खूप धम्माल करत असल्याचं दिसून येत आहे. शाहिद आणि मृणालचं स्वागत केल्यानंतर कपिल म्हणतो की, तुझा हा जो जर्सी चित्रपट येत आहे, त्याची टायमिंग अप्रतिम आहे भावा. जर्सी 31 डिसेंबरला येत आहे, त्यानुसार नाव एकदम परफेक्ट सूट होत आहे. परंतु जर हा चित्रपट जूनमध्ये आला असता तर याच नाव बनियान असं ठेवावं लागलं असतं. कपिलच्या या विनोदाने शाहिदसह सर्वच प्रेक्षक हसायला लागतात.
(हे वाचा: शाहरुख खानने सुरु केलं 'Tiger 3' चं शूटिंग; किंग खानचा जबरदस्त LOOK VIRAL)
यानंतर मृणाल ठाकूरसोबत चेष्टामस्करी केल्यानंतर कपिल शर्मा शाहिदला म्हणतो की, तू ४०-५० दिवस शूट करत असतोस. परंतु या गरीब माणसाच्या हातात फक्त एक तास आहे. यावर शाहिद लगेचच उत्तर देत म्हणतो की, ज्या दिवशी कपिल शर्मासारखा गरीब माणूस आपल्या देशात असेल त्यादिवशी हा देश जगातील सर्वात श्रीमंत देश होईल'. यांनतर कपिलसह सर्वच लोक हसायला लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.