मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शाहरुख खानने सुरु केलं 'Tiger 3' चं शूटिंग; किंग खानचा जबरदस्त LOOK VIRAL

शाहरुख खानने सुरु केलं 'Tiger 3' चं शूटिंग; किंग खानचा जबरदस्त LOOK VIRAL

क्रूझ ड्रग्स प्रकरणात आपला मुलगा आर्यन खानची   (Aryan Khan Drugs Case)  जामिनावर सुटका झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी शाहरुख खान   (Shahrukh Khan)  कामावर परतला आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात आपला मुलगा आर्यन खानची (Aryan Khan Drugs Case) जामिनावर सुटका झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी शाहरुख खान (Shahrukh Khan) कामावर परतला आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात आपला मुलगा आर्यन खानची (Aryan Khan Drugs Case) जामिनावर सुटका झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी शाहरुख खान (Shahrukh Khan) कामावर परतला आहे.

मुंबई, 24 डिसेंबर-  क्रूझ ड्रग्स प्रकरणात आपला मुलगा आर्यन खानची   (Aryan Khan Drugs Case)  जामिनावर सुटका झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी शाहरुख खान   (Shahrukh Khan)  कामावर परतला आहे. बुधवारी अभिनेता चित्रपटाच्या सेटवर दिसून आला. किंग खानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि चष्मा घालून, केसांचा बन बांधून सेटवर येताना दिसला. हा फोटो पाहून लोकांचा असा विश्वास आहे की तो 'पठाण' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. परंतु असं नाहीय.

शाहरुख खानने 'टायगर 3'    (Tiger 3)   चं शूटिंग सुरू केल्याचं न्यूज 18 ला कळालं आहे. एका सूत्रानं सांगितलं की, 'पठाण'   (Pathan) मधील शाहरुखची भूमिका आणि 'टायगर 3' मधील सलमान खानची   (Salman Khan)  व्यक्तिरेखा यामध्ये क्रॉस ओव्हर आहे. शाहरुखने 'टायगर 3' मधील त्याच्या भूमिकेचं शूटिंग सुरू केलं आहे. आणि त्यासाठी शाहरुख खाननं सुमारे दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. सलमान, सध्या त्याच्या पर्सनल कमिटमेन्ट आणि बिग बॉसमध्ये व्यस्त आहे. तो लवकरच शाहरुखसोबत शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे.

यानंतर शाहरुख खान लगेचच सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' चित्रपटासाठी शूटिंग करणार आहे. सूत्राच्या माहितीनुसार, “शाहरुख अलीकडेच चित्रपटासाठी त्याच्या लूकमध्ये परतताना दिसला. 'टायगर 3' पूर्ण केल्यानंतर तो लवकरच एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी स्पेनला रवाना होणार आहे. शाहरुखसोबत त्याची सह-अभिनेत्री दीपिका पदुकोणही सामील होणार आहे. कारण दीपिका आणि शाहरुख दोघेही एका रोमँटिक गाण्याचं शूटिंग करणार आहेत. याशिवाय शाहरुख चित्रपटासाठी काही हाय ऑक्टेन अॅक्शन सीन करताना दिसणार आहे.

(हे वाचा:'83'च्या निर्मात्यांना बसणार मोठा दणका! रिलीज होताच LEAK झाला रणवीरचा चित्रपट )

यापूर्वी चित्रपटाच्या सेटवरून सलमान खानच्या लूकचे फोटो आणि व्हिडिओ लीक झाले होते. सलमानचा हा लूक 'टायगर 3' मधला असल्याचं बोललं जात आहे. फोटोमध्ये सलमान खान क्रूसोबत उभा दिसत असून तो खूपच वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सलमान खान पांढरा टी-शर्ट, लाल जॅकेट आणि डोक्यावर लाल रुमाल बांधलेला दिसत आहे. त्याची दाढी लाल आणि लांब आहे. तसेच केस खांद्यापर्यंत वाढलेले दिसून येत आहेत.

First published:

Tags: Entertainment, Salman khan, Shahrukh khan