मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Tiger Shroff- Disha Patani breakup: टायगर-दिशा यांचं ब्रेकअप; 6 वर्षांचं नातं संपुष्टात

Tiger Shroff- Disha Patani breakup: टायगर-दिशा यांचं ब्रेकअप; 6 वर्षांचं नातं संपुष्टात

टायगर आणि दिशा यांना एक लोकप्रिय कपल म्हणून चाहते ओळख होते. त्यांनी कधीच आपलं नातं जगजाहीर केलं नसलं तरी त्यांना कायम एकत्र पाहण्यात आलं होतं.

टायगर आणि दिशा यांना एक लोकप्रिय कपल म्हणून चाहते ओळख होते. त्यांनी कधीच आपलं नातं जगजाहीर केलं नसलं तरी त्यांना कायम एकत्र पाहण्यात आलं होतं.

टायगर आणि दिशा यांना एक लोकप्रिय कपल म्हणून चाहते ओळख होते. त्यांनी कधीच आपलं नातं जगजाहीर केलं नसलं तरी त्यांना कायम एकत्र पाहण्यात आलं होतं.

मुंबई 27 जुलै: बॉलिवूडच्या एका क्युट कपलचं नातं संपुष्टात आल्याची बातमी समोर येत आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांच्या नात्याशी निगडित ही एक महत्त्वाची माहिती आहे. तब्बल सहा वर्ष एकमेकांसोबत राहिल्यानंतर बॉलिवूडचं हे कपल आता एकत्र नसल्याचं समोर येत आहे. चाहत्यांच्या या लाडक्या कपलने ब्रेकअप का केलं याचं कारण अजून समोर आलेलं नाही.

दिशा आणि टायगर यांच्या नात्याला पूर्णविराम

दिशा आणि टायगर यांनी कधीच आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. पण ते अनेकदा सोबत बघितले जात होते. हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार त्यांच्या नात्यात मागच्या वर्षांपासून अनेक चढ-उतार येताना दिसत होते. पण तरीही त्यांनी याबद्दल वाच्यता न केल्याचं समोर येत आहे.

टायगरच्या एका जवळच्या मित्राने हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपच्या बातमीला दुजोरा दिला आहे. टायगर मित्राच्या सांगण्यानुसार टायगरने याचा परिणाम आपल्या कामावर होऊ दिला नसून तो आधीसारखाच कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करताना दिसून येत आहे. टायगर सध्या लंडनमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

हे ही वाचा- आमिर खानमुळे झाला समंथा प्रभू-नागा चैतन्यचा घटस्फोट? प्रसिद्ध सेलेब्रिटीचा खळबळजनक दावा

वर्क फ्रंटवर दोन्हीही कलाकार सध्या बरेच व्यस्त असताना दिसत आहेत. दिशा येत्या काळात एक व्हिलन रिटर्न्स या प्रोजेक्टमध्ये दिसून येणार आहे. तर टायगर गणपत, आणि बाघी 4 असा प्रोजेक्टमध्ये दिसून येणार आहे. टायगरच्या नव्या सिनेमाची नुकतीच घोषणा सुद्धा झाली आहे. शशांक खैतानच्या ‘स्क्रू ढिला है’ नावाच्या सिनेमात टायगर झळकताना दिसणार आहे. दोघांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला असला तरी दोघांची मैत्री टिकून असल्याचं समजत आहे.

दिशा आणि टायगर हे चाहत्यांच्या लाडक्या कपलपैकी एक आहेत. अगदी व्हेकेशन पासून अनेक इव्हेंट्समध्ये दोघेही कायम एकत्र दिसून यायचे.

त्यांच्या ब्रेअकपने त्यांच्या असंख्य चाहत्यांवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळल्याचं समोर येत आहे. दिशा आणि टायगर यांच्यावर भरभरून प्रेम करणारे अनेक फॅन्स आहेत तसंच त्यांच्या नावाचे अनेक फॅनक्लब सुद्धा आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Break up, Disha patani, Tiger Shroff