मुंबई, 27 जुलै- सध्या मनोरंजनसृष्टीत रिमेकची चलती सुरु आहे. हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्सच्या 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाचा आता हिंदी रिमेक येतोय. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं नाव 'लाल सिंह चढ्ढा' असं आहे. या चित्रपटात बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटामुळे आमिर खान प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात आमिरसोबत करिना कपूर आणि साऊथ स्टार आणि समंथा प्रभूचा एक्स पती नागा चैतन्यसुद्धा आहे. दरम्यान आता आमिर आणि नागा चैतन्यबाबत एक चकित करणारी गोष्ट समोर आली आहे. आणि गोष्टीचा थेट संबंध समंथासोबत आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री समंथा प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य हे साऊथमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जात होते. चाहत्यांना ही जोडी प्रचंड पंसत होती. परंतु या दोघांनी अचानक घटस्फोट घेत चाहत्यांसोबतच अनेक सेलेब्रेटींनासुद्धा धक्का दिला होता. त्यांच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु होत्या. यामध्ये समंथा आणि नागमध्ये नेमकं का खटकलं? याबाबत अनेक अंदाज बांधण्यात आले होते. दरम्यान आता या दोघांच्या घटस्फोटाबाबत आणखी एक कारण समोर आलं आहे. एका सेलिब्रेटीने आरोप करत या सर्व बाबीला आमिर खान जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
वास्तविक कमाल आर खानने ट्विट करत याबाबत सांगितलं आहे. कमाल आर खान अर्थातच केआरके सतत वादग्रस्त वक्तव्ये करत चर्चेत असतो. यावेळी त्याने आमिर खानवर निशाणा साधला आहे. त्याने ट्विट करत लिहलंय, ''नागा चैतन्यने आपल्या एका दिग्दर्शक मित्राला सांगितलंय की, 'लाल सिंह चढ्ढा' मध्ये काम करुन त्याला पश्चाताप होत आहे. हा अनुभव खूपच वाईट आहे. परंतु त्याला आता या चित्रपटाला चांगलं म्हणण्याशिवाय काहीच पर्याय नाहीय''.
I got full story, how #AamirKhan convinced #NagaChaitanya to divorce his wife #Samantha. Means he is having full black heart 🖤! Toh Bhai Aise Aadmi Ki film Toh Nahi Chal Sakti. My review will release soon.
— KRK (@kamaalrkhan) July 25, 2022
(हे वाचा: Neha Kakkar: नेहा कक्करने आयुष्यात पहिल्यांदाच बनवला 'टॅटू'; यामध्ये नेमकं लिहलंय तरी काय?)
इतकंच नव्हे तर आमिर खानच समंथा आणि नागाच्या घटस्फोटाचं कारण असल्याचं सांगत केआरकेने पुढं लिहलंय, ''आता मला संपूर्ण गोष्ट समजली आहे. आमिर खाननेच नागा चैतन्यला पत्नी समंथासोबत घटस्फोट घेण्यासाठी तयार केलं होतं. त्यानेच घटस्फोटाकडे त्याचं मन वळवलं होतं. आमिर खानचं मन पूर्ण काळं आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचा चित्रपट तर बॉक्स ऑफिसर अजिबात चालणार नाही'. असं लिहत केआरकेने खळबळ उडवून दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Bollywood News, Entertainment, South actress