Panipat: अर्जुन कपूरच्या सदाशिवरावांसमोर फिका पडला संजूचा अहमद शाह अब्दाली

Panipat: अर्जुन कपूरच्या सदाशिवरावांसमोर फिका पडला संजूचा अहमद शाह अब्दाली

हा सिनेमा पानीपतची तिसरी लढाईवर आधारित आहे. ही लढाई मराठा आणि अब्दाली यांच्यात 1761 मध्ये झाली होती.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर- अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सेनन यांचा आगामी पानीपत सिनेमाचा ट्रेलर 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी सिनेमातील मुख्य कलाकारांचे लुक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. पोस्टरमध्ये संजय दत्त अहमद शाह अब्दालीची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर क्रिती सेन पार्वती बाईंच्या लुकमध्ये फार सोज्वळ दिसत आहे. पानीपत सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखा सदाशिवराव भाऊ यांची व्यक्तिरेखा अभिनेता अर्जुन कपूर साकारत आहे. यावेळी अर्जुनचा युद्धावेळचा लुकही प्रदर्शित करण्यात आला.

कसा आहे संजय दत्तचा लुक-

पोस्टरमध्ये संजय फारच क्रूर अवतारात दिसत आहे. पोस्टरवर संजयने युद्धाच्यावेळचा पोशाख घातला आहे. सिनेमातही संजयने अनेक वजनदार कपडे घातले आहेत. याशिवाय व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी आपल्या डाएट प्लॅनमध्येही त्याने काही बदल केले आणि जिममध्ये जाऊन घाम गाळला.

 

View this post on Instagram

 

Ahmad Shah Abdali - Death Strikes Where His Shadow Falls. Panipat Trailer Out Tomorrow. #PanipatLook #Panipat #Dec6 @duttsanjay @kritisanon #AshutoshGowariker @sunita.gowariker #RohitShelatkar @ckmurali.dop @nitinchandrakantdesai @neeta_lulla @padminikolhapure @mohnish_bahl #ZeenatAman @agppl @visionworldfilm @reliance.entertainment @zeemusiccompany @avigowariker

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

कसा आहे क्रिती सेननचा लुक-

क्रितीच्या करिअरमधील हा पहिला ऐतिहासिक सिनेमा आहे. पारंपरिक दागिने आणि साडीत क्रिती फार सुंदर दिसते हे काही वेगळं सांगायला नको. या भूमिकेसाठी तिने घोडेस्वारी शिकली. तिची ही मेहनत रुपेरी पडद्यावर कशी दिसते हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

कसा आहे अर्जुन कपूरचा लुक-

अर्जुनने सिनेमात सदाशिवराव भाऊ ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. पानीपत हा संपूर्ण सिनेमा या व्यक्तिरेखेभोवती फिरतो. पोस्टरमध्ये अर्जुन यौद्ध्याच्या पोशाखात दिसतो. तसेच त्याच्या डोळ्यातली चिड आणि राग पोस्टरमध्ये स्पष्ट जाणवतो. अर्जुनच्या करिअरमधील ही आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका आहे. या भूमिकेसाठी अर्जुनने तुफान मेहनतही घेतली.

कधी होणार प्रदर्शित-

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित हा सिनेमा 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा पानीपतची तिसरी लढाईवर आधारित आहे. ही लढाई मराठा आणि अब्दाली यांच्यात 1761 मध्ये झाली होती. यात संजय दत्त आणि अर्जुन कपूर यांची मुख्य भूमिका आहे.

स्टारचा मुलगा संन्यासी होण्याच्या मार्गावर, 28 व्या वर्षी गेला ओशोच्या आश्रमात

जेव्हा हा बॉलिवूड स्टार रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना फाइव्ह स्टारमध्ये घेऊन जातो

शाहिद कपूरच्या पावलांवर पाऊल ठेवत ही अभिनेत्री करणार Arrange Marriage

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं WhatsApp अकाउंट झालं हॅक, हॅकर करतोय अश्लील व्हिडीओ

Promo Video: जेव्हा गरिबीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलाचा मृत्यू होतो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 05:33 PM IST

ताज्या बातम्या