जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / भारत-चीन वादाचा निर्मात्यांना फटका; आमिर खाननं दिला चित्रपटात काम करण्यास नकार

भारत-चीन वादाचा निर्मात्यांना फटका; आमिर खाननं दिला चित्रपटात काम करण्यास नकार

भारत-चीन वादाचा निर्मात्यांना फटका; आमिर खाननं दिला चित्रपटात काम करण्यास नकार

अमीर ला चित्रपटाच्या स्क्रिप्ट मध्ये काही बदल हवे होते. पण निर्माते, दिग्दर्शक मात्र त्या गोष्टीसाठी तयार नव्हते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 एप्रिल : ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा बॉलिवूडचा (Bollywood movie)  बहूचर्चित चित्रपट असून अभिनेता अमीर खान (Amir khan) यात मुख्य भूमिका साकारणार होता, पण काही दिवसांपूर्वीच अमीरने चित्रपट सोडल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण त्यामागचं नेमक कारण स्पष्ट झालं नव्हतं. विक्रम वेधा हा तमिळ चित्रपट (tamil movie) आहे तर आता त्याचा हिंदी रिमेक (hindi remake) बनत आहे. तर चित्रपटाचं नावही तेच असणार आहे. पण आता एका वेबसाइने दिलेल्या माहितीनुसार अमीरला चित्रपटाच्या स्क्रिप्ट मध्ये काही बदल हवे होते. पण निर्माते, दिग्दर्शक मात्र त्या गोष्टीसाठी तयार नव्हते. अमीर ला चित्रपट हा संपूर्ण आशियायी प्रेक्षकांच्या (Asian audience) दृष्टीने बनवायचा होता. अमीर ला चित्रपटाची कथा ही चीन शी (china)  संबधीत ठेवायची होती. चीन हा बॉलिवूडसाठी नेहमीच मोठं मार्केट ठरला आहे. जेणेकरून चित्रपट चीन मध्येही चांगले पैसे कमावू शकेन.  तर हाँगकाँग मधील एका गँगस्टरची कथा त्याला दाखवायची होती. पण सध्या भारत – चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावाने ते शक्य नसल्याचं दिगदर्शक तसेच निर्मात्यांनी म्हटलं. आणि त्यानंतर अमीर ने चित्रपटातून काढता पाय घेतला.

जाहिरात

सुरुवातीला चित्रपटासाठी अभिनेता हृतिक रोशनची (Hritik Roshan) निवड करण्यात आली होती. पण तारखा मिळत नसल्याने चित्रपट अमीर खान कडे गेला होता. पण निर्मात्यांनी पुन्हा एकदा आता हृतिक ला गाठलं आहे. व हृतिकने देखिल चित्रपटासाठी होकार दिला आहे. लवकरच चित्रपटच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘Black And White’ फोटो शेअर करत विद्या बालनने सांगितली खूप मोठी गोष्ट, चाहतेही झाले भावुक..

अमीर त्याचे आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्डा’ (Laal singh chadda)  आणि ‘कोइ जाने ना’ (koi jane na)  या चित्रपटांत तो दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात