'Black And White' फोटो शेअर करत विद्या बालनने सांगितली खूप मोठी गोष्ट, चाहतेही झाले भावुक..

'Black And White' फोटो शेअर करत विद्या बालनने सांगितली खूप मोठी गोष्ट, चाहतेही झाले भावुक..

विद्याने आपल्या सोशल मीडियावर(social media) एक ब्लॅक अँड व्हाईट (black and white photo)फोटो शेअर केला आहे. त्या फोटोने आणि त्याच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

  • Share this:

मुंबई, 16एप्रिल- बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार (Bollywood Stars)आहेत. जे नेहमीच आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. बॉलीवूडमध्ये अशीच एक अभिनेत्री आहे जी आपल्या खास शैलीमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते. ती अभिनेत्री म्हणजे विद्या बालन(Vidya Balan) होय. विद्या नेहमीच आपल्या वेगळ्या अंदाजासाठी चर्चेत असते. नुकताच विद्याने आपल्या सोशल मीडियावर(social media) एक ब्लॅक अँड व्हाईट (black and white photo)फोटो शेअर केला आहे. त्या फोटोने आणि त्याच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. जाणून घेऊया या फोटोमध्ये नेमकं काय खास आहे.

असं म्हटलं जातं की जेव्हा बाहेरील जगात सर्व काही अस्ताव्यस्त झालेलं असतं.  त्यावेळी आपण फक्त आपल्या मनाला शांत केलं पाहिजे. जेव्हा बाहेरच्या जगात फक्त दुख आणि यातना मिळत असतात. तेव्हा आपण स्वतः मध्ये आनंद शोधायला हवा. स्वतःमध्ये आनंदी राहायला शिकायला हवं. याचाचं अर्थ असा की ज्यावेळी आपण आपली दृष्टी बदलतो तेव्हा जगही बदलतं. आयुष्याकडे बघण्याचा असाच काहीसा मंत्र विद्या बालन  शिकवत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

विद्या बालनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. त्यात विद्या काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये खुर्चीवर बसलेली आहे. आणि त्या फोटोला कॅप्शन देतं तिनं म्हटलं आहे.’मला काळ पांढरं जग अजिबात नाही आवडत फक्त फोटो आवडतो'.

(अवश्य वाचा: 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा असा लूक; PHOTO पाहून चाहत्यांची हृदयाची वाढली धडधड )

यावरून विद्या आपल्याला हेचं सुचवत आहे. आपल्या आयुष्यात सुख आणि दुख या गोष्टी येतात आणि जातात मात्र आपण आपला अंतर्गत आनंद हरवता कामा नये. काळा आणि पांढरा रंग फक्त फोटोतच चांगला दिसतो. आपलं मन कायम विविध रंगानी भरलेलं असावं. आयुष्याच्या या अतिशय महत्वाच्या तत्वाला विद्यानं अगदी साधेपणाने सांगितलं आहे.

बॉलीवूडची अष्टपैलू अभिनेत्री म्हणून विद्या बालनला ओळखलं जातं. ती नेहमीचं काहीतरी हटके करत असते. विद्या ही अशी अभिनेत्री आहे जिला बॉलीवूडमध्ये आपले चित्रपट चालविण्यासाठी कोणत्याही मोठ्या अभिनेत्याची गरज नाही. विद्याचा प्रत्येक चित्रपट हा नायिका केंद्रित असतो. आणि तिच्या प्रत्येक चित्रपटाला चाहते भरभरून दादसुद्धा देतात.

(अवश्य वाचा: 'इथं लोक मरतायेत आणि तू...', 'त्या' VIDEO मुळे पूजा बेदी होतेय ट्रोल )

काही महीन्यांपूर्वी विद्या ‘शकुंतला’ या चित्रपटात झळकली होती. यातसुद्धा तिच्या अभिनयाची खुपचं वाहवाह झाली होती. तसेच विद्या लवकरच ‘शेरनी’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये ती एका वनअधिकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.

Published by: Aiman Desai
First published: April 16, 2021, 3:43 PM IST

ताज्या बातम्या