मुंबई 28 एप्रिल: सध्या देशभरात कोरोनाने थैमान (corona pandemic) घातलं आहे. रुग्णसंख्या वाढत असून बेड्स , ऑक्सिजन मिळणही अवघड होऊन बसलं आहे. अशातच अनेकजन पुढे येऊन मदतीचा हात पुढे करत आहेत. त्यात काही बॉलिवूड सेलिब्रिटीजचाही (Bollywood celebrities donates) समावेश आहे. या कठीण काळात त्यांनी मोठी मदत केली आहे. अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) ने मुंबई महानगर पालिकेला 1 कोटी रुपयांच दान केलं आहे. अजयचं एन व्हाय फाउंडेशन या संस्थेमार्फत त्याने हे दान केलं आहे. 20 बेड्सचं सर्व अत्यावाश्यक सेवांसह असलेलं कोव्हीड 19 आयसीयु हॉस्पिटल (covid 19 ICU hospital) बांधण्यासाठी त्याने ही मदत दिली आहे. मुंबईच्या भारत स्काउट्स अँड गाइड्स हॉल, शिवाजी पार्क इथे हे उभारण्यात येणार आहे.
लॉकडाऊनचे नियम मोडणं पडलं भारी; बॉलिवूड अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक
हे आय सी यु हॉस्पिटल सर्वअत्यावश्यक सुविधांसह पॅरासॉमॉनिटर्स, व्हेन्टीलेटर्स, ऑक्सिजन असणार आहे. तर हिंदुजा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सच्या निरिक्षणाखाली सुरु होणार आहे.
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) यांनी मिळून 100 ऑक्सिजन गाळप मशिन्स (Oxygen concentrators) दान केल्या आहेत. एका संस्थेला त्यांनी हे दान दिलं आहे. याशिवाय क्रिकेटर गौतम गंभीर (Gutam Gambhir) याच्या दिल्लीतील एका संस्थेला अक्षयने 1 कोटी रुपयांच दान दिलं आहे.
Every help in this gloom comes as a ray of hope. Thanks a lot @akshaykumar for committing Rs 1 crore to #GGF for food, meds and oxygen for the needy! God bless 🙏🏻 #InThisTogether @ggf_india
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 24, 2021
अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) विषयी वेगळं सांगायला नको. गेल्या वर्षभरापासून सोनू गरजूंना मदत करत आहे.
We are trying our best to reach out to you. If there are delays or we miss out.
— sonu sood (@SonuSood) April 28, 2021
Then pardon me..Apologies🙏 pic.twitter.com/4NvjrnZ4zP
तर आता त्याच कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. नुकतचं सोनूने रुग्णांसाठी एक अँप तयार केलं आहे. तर याशिवाय रोजच तो निरनिराळ्या पद्धतीची मदत तो लोकांना करतो. याशिवाय फ्री कोव्हिड हेल्प नावाची एक नवी योजनाही त्याने सुरु केली आहे.
You, take REST.
— sonu sood (@SonuSood) April 27, 2021
Let me handle the TEST.
Launching FREE COVID HELP with @HealWell24 @Krsnaa_D@SoodFoundation pic.twitter.com/TXDEp5jRAc
अभिनेता सलमान खान (Salman Khan) ने ही या कठीण काळात मदत करण्याचं ठरवलं आहे. फ्रंटलाइन वर्कर्स साठी त्याने जेवनाची व्यवस्था केली आहे, बिइंग हंगरी (being haangryy initiative) या नावाने त्याने ही योजना सुरु केली आहे.
नुकतेच त्याने पाच हजार जेवनाचे डबे वाटले होते तर स्वता ते जेवन क्वालिटी टेस्ट साठी खाऊन पाहिलं होतं. यानंतर अभिनेता आयुषमान खुराना (Ayushman Khurana) आणि पत्नी ताहीरा कश्यप (Tahira Kashyap) यांनीही या कठीण काळात मदत केली आहे. महाराष्ट्र चीफ मिनिस्टर रिलिफ फंड (Maharashta chief ministers relief fund) मध्ये त्या दोघांनीही पैशांची मदत दान केली आहे.
अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनीही १ कोटी रुपयांची मदत केली आहे.
चंढीगड मध्ये व्हेन्टील्टर्स खरेदी करण्यासाठी त्यांनी ही मदत केली आहे.