मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणबीर-कतरिनाच्या नात्यात का आला दुरावा?; पाहा पडद्यामागील ब्रेकअप स्टोरी

रणबीर-कतरिनाच्या नात्यात का आला दुरावा?; पाहा पडद्यामागील ब्रेकअप स्टोरी

कतरिनासाठी रणबीरनं थेट सलमान खानशी देखील पंगा घेतला होता. हे भांडण इतकं वाढलं होतं की सलमानला समजवण्यासाठी चक्क ऋषी कपूर मध्ये पडले होते. परंतु प्रश्न असा की इतकं सीरिअस अफेअर असताना देखील दोघांचं ब्रेकअप का झालं?

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 22 मार्च: अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut) सीरिअल स्कर्ट चेंजर म्हणत अभिनेता रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) खिल्ली उडवली होती. रणबीरच्या पार्श्वभूमीमुळं तिच्या या वक्तव्याला अनेक नेटकऱ्यांनी पाठिंबा देखील दिला होता. रणबीरनं आजवर दीपिका पदुकोण, माहिरा खान, नरगिस फाकरी, सोनम कपूर, एंजल जॅक्सन, अवनिता मलिक यांसारख्या अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. परंतु यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती अभिनेत्री कतरिना कैफची (Katrina Kaif). कतरिनासाठी रणबीरनं थेट सलमान खानशी देखील पंगा घेतला होता. हे भांडण इतकं वाढलं होतं की सलमानला समजवण्यासाठी चक्क ऋषी कपूर मध्ये पडले होते. परंतु प्रश्न असा की इतकं सीरिअस अफेअर असताना देखील दोघांचं ब्रेकअप का झालं?

रणबीर आणि कतरिना यांच्यात 2009 साली ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ या चित्रपटादरम्यान मैत्री झाली. पुढे ‘राजनीती’ या चित्रपटादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांना अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं जाऊ लागलं. जवळपास सहा वर्ष दोघं लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात होते. अर्थात दोघांना लग्न देखील करायचं होतं. परंतु त्यांच्या लग्नाला रणबीरची आई नीतू कपूर यांचा विरोध होता. परिणामी त्यांच्या विरोधामुळं रणबीर आणि कतरिनाच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. अन् पाहता पाहता दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर कतरिना बराच काळ नैराश्येत होती. तिनं बॉलिवूड सोडून देण्याचा देखील विचार केला होता.

अवश्य पाहा - आयत्या घरात घरोबा...अभिनेत्याच्या घरात घुसून चोरायचा दारु; पोलिसांनी केली अटक

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत कतरिनानं आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. “कुणीही असूद्या, जुन्या गोष्टींबाबत माझ्या मनात काहीच नाही. कुणी माझं मन दुखवलंय, असं मला वाटत नाही. प्रत्येकजण स्वत: साठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अनेकदा काहीतरी चांगलं देण्याच्या नादात आपण स्वत:चं नुकसान करुन बसतो. त्यामुळेच मला मित्रांपेक्षा शत्रूंवर जास्त विश्वास आहे. ब्रेकअप वाईट आहे. ब्रेकअप या जगातील सर्वात वाईट आणि भयानक गोष्ट आहे. ब्रेकअपमुळे आयुष्यात आता काहीच राहीलं नाही, असं वाटतं”, असं कतरिना म्हणाली होती.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Katrina kaif, Love, Ranbir kapoor, Relationship