मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आयत्या घरात घरोबा...अभिनेत्याच्या घरात घुसून चोरायचा दारु; पोलिसांनी केली अटक

आयत्या घरात घरोबा...अभिनेत्याच्या घरात घुसून चोरायचा दारु; पोलिसांनी केली अटक

अखेर पोलिसांनी सापळा रचून त्या चोराला पकडलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा तो बाथरुममध्ये अंघोळ करत होता.

अखेर पोलिसांनी सापळा रचून त्या चोराला पकडलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा तो बाथरुममध्ये अंघोळ करत होता.

अखेर पोलिसांनी सापळा रचून त्या चोराला पकडलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा तो बाथरुममध्ये अंघोळ करत होता.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 22 मार्च: जॉनी डेप (Actor Johnny Depp) म्हटलं की मोठमोठ्या गुप्तहेरांना चकवा देणारा जॅक स्पॅरो आठवतो. या अभिनेत्यानं पायरेट्स ऑफ द कॅरिबियन (Pirates of the Caribbean) या चित्रपटमालिकेच्या जोरावर तब्बल एक दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. परंतु चित्रपटांमधून पोलिसांना गुंगी देणारा जॉनी सध्या एका चोरामुळं त्रस्त होता. हा चोर जॉनीच्या घरात घुसून त्याच्या महागड्या दारुच्या बाटल्या चोरायचा. शिवाय किचमध्ये जाऊन जेवायचा अन् पळून जायचा. अखेर पोलिसांनी सापळा रचून त्या चोराला पकडलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा तो बाथरुममध्ये अंघोळ करत होता.

जॉनी डेप गेल्या काहीत काळात एका चोरामुळं त्रस्त होता. तो घरात नसताना एक अज्ञात व्यक्ती त्याच्या घरात घुसायचा. सर्वप्रथम तो घरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद करायचा. त्यानंतर अंघोळ वगैरे करुन घरातील जेवण, दारु आणि महागड्या वस्तू चोरायचा. गेले अनेक महिने हा प्रकार सुरु होता. अखेर अभिनेत्याच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेमुळं हा चोर पोलिसांच्या हाती लागला आहे.

अवश्य पाहा - ध्वनीनं 21व्या वर्षी केला अनोखा रेकॉर्ड; ठरली देशातील सर्वात लोकप्रिय गायिका

जॉनी घरात नसताना चक्क छतावरुन हा आतमध्ये घुसला. अन् त्यानं आपला नेहमीचा कारभार सुरु केला. तेवढ्यात शेजारी राहणारी एक महिला गेटवरुन जात असताना तिला घरात दिवे सुरु असल्याचं जाणवलं. आज जॉनी घरात तर नाही आहे मग हे दिवे का जळतायेत असा प्रश्न तिला पडला. त्यानंतर तिनं त्वरित पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घरात घुसून त्याला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे पोलिसांनी जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तेव्हा तो बाथरुममध्ये अंघोळ करत होता.

 अवश्य पाहा - जॉनवर आली तिकिटं विकण्याची वेळ; ‘मुंबई सागा’कडं प्रेक्षकांनी फिरवली पाठ

जॉनी डेप हा हॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता आहे. त्यानं 1885 साली अ नाईटमेर ऑन फिल्म स्ट्रीट या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं प्रायव्हेट रिसॉर्ट, पायथन, एड वुड, निक ऑफ टाईम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. जॉनीला खरी लोकप्रियता मिळाली ती पायरेट्स ऑफ द कॅरेबियन या चित्रपटांमुळं. या चित्रपटांमध्ये त्यानं साकारलेल्या जॅक स्पॅरो या व्यक्तिरेखेला ऑस्करसाठी देखील नामांकन मिळालं होतं. अलिकडेच तो मिमांथा या चित्रपटात झळकला होता.

First published:

Tags: Actor, Alcohol, Hollywood, Robbery, Theft