देवीयों और सज्जनो...! KBC 12 मध्ये पुन्हा घुमणार बिग बींचा आवाज, कोरोनाकाळातील सेटवरील तयारीचा हा INSIDE VIDEO

देवीयों और सज्जनो...! KBC 12 मध्ये पुन्हा घुमणार बिग बींचा आवाज, कोरोनाकाळातील सेटवरील तयारीचा हा INSIDE VIDEO

कौन बनेगा करोडपती 12 (Kaun Banega Crorepati 12) अर्थात KBC 12 पुढील सोमवारपासून सुरू होत आहे. पुन्हा एकदा महानायक अमिताभ बच्चन यांच्या दिमाखदार आवाजात या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : कौन बनेगा करोडपती 12 (Kaun Banega Crorepati 12) अर्थात KBC 12 पुढील सोमवारपासून सुरू होत आहे. पुन्हा एकदा महानायक अमिताभ बच्चन यांच्या दिमाखदार आवाजात या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कोरोनावर मात करून या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार आहेत, त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक इंडस्ट्रीला फटका बसला. मनोरंजन क्षेत्र देखील यामध्ये अपवाद नाही. अनेक सिनेमा, रिअॅलिटी शो, मालिकांचे शूटिंग काही महिने बंद होते. त्यामुळे केबीसीचा देखील नवा सीझन येणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. दरम्यान आता केबीसी 12 ची घोषणा करण्यात आली आहे तर 28 सप्टेंबरपासून हा शो सुरू होत आहे. कोरोना काळात या कार्यक्रमाची सुरुवात होत असल्याने एक विशेष खबरदारी निर्मात्यांना सेटवर घ्यावी लागणार आहे.

(हे वाचा-'अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली', सोनालीचे मनाला भुरळ घालणारे PHOTOS पाहिलेत का?)

केबीसीच्या निर्मात्यांनी केबीसीच्या  सेटची झलक दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एवढ्या मोठ्या 'सेटबॅक'नंतर मजबूत 'कमबॅक'साठी केबीसी कसे तयार आहे याबाबत सांगण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता केबीसी पाहता येणार आहे.

या व्हिडीओमध्ये केबीसीच्या सेटवर सॅनिटायझेनबाबत कशी काळजी घेण्यात आली आहे याची माहिती दिग्दर्शक अरूण शेषकुमार आणि फ्लोअर मॅनेजर संदीप कौल यांनी दिली. गेली अनेक वर्ष ते या  शो सोबत जोडले गेले आहेत.

(हे वाचा-प्रेग्ननंट अनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP)

याठिकाणी सेटवर विविध ठिकाणी खबरदारी घेण्याबाबत स्टिकर्स लावण्यात आले आहेत, ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत. या संपूर्ण खबरदारीने या शो कमबॅक करत असल्याने, सेटवर देखील उत्साहाचे वातावरण आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महत्त्वाची बाब म्हणजे केवळ 50 टक्के क्रू मेंबर्ससह हा भव्य शो प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी निर्माते-दिग्दर्शकांवर आहे.

काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या केबीसीच्या धमाकेदार प्रोमोला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अमिताभ यांना पुन्हा एकदा केबीसीच्या सेटवर बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत कमेंट्स केल्या आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 22, 2020, 9:35 AM IST

ताज्या बातम्या