मराठी सिनेसृष्टीतली अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांसाठी रोजचे वेगवेगळे अपडेट्स देत असते. (Photo credit- sonalee18588 instagram)
सध्या सोनाली एका रिअॅलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा शो 24 सप्टेंबरपासून येणार असल्याची माहिती सोनालीनं स्वत: आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून दिली आहे. (Photo credit- sonalee18588 instagram)
मराठी सिनेसृष्टीत नटरंग चित्रपटातून घराघरा पोहोचलेली अप्सरा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोच्या सेटवरील शूटिंगदरम्यानचे खास फोटो सोनालीनं शेअर केले आहेत. (Photo credit- sonalee18588 instagram)
या फोटोमध्ये आपण पाहून शकता सोनालीनं निळ्या रंगाचा गाऊन घातला आहे. या गाऊनमध्ये तिचं सौंदर्य आणखीन खुलून दिसत आहे. (Photo credit- sonalee18588 instagram)
सोनालीच्या अदांवर चाहतेही पुरते घायाळ झाले आहेत. निळ्या ड्रेसमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे. (Photo credit- sonalee18588 instagram)
'डान्सिंग क्वीन'च्या प्रोमो शूट दरम्यान हे फोटोशूट केल्याची माहिती सोनालीनं आपल्या इन्स्टावर दिली आहे. (Photo credit- sonalee18588 instagram)