अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
विराटने अनुष्काचा बेबी बंपसह फोटो शेअर करत आपण आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. या फोटोत अनुष्का खूपच सुंदर दिसत होती.
यानंतर अनुष्काने आपला बेबी बंपसह आणखी एक फोटो शेअर केला होता. एका समुद्रकिनाऱ्यावरचा हा फोटोही सुंदर होता.
तर आता अनुष्काने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ब्लॅक स्विमसूटमध्ये दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावर तेज, हसू आणि आनंदही दिसून येतो आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे.
अनुष्का आणि विराट आपल्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. दोघंही आपले एकत्र फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर करत असतात.