जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Adah Sharma: बॉलिवूडमध्ये होणाऱ्या भेदभावाविषयी स्पष्टच बोलली अदा शर्मा; म्हणाली 'अशा वातावरणात काम करताना...'

Adah Sharma: बॉलिवूडमध्ये होणाऱ्या भेदभावाविषयी स्पष्टच बोलली अदा शर्मा; म्हणाली 'अशा वातावरणात काम करताना...'

अदा शर्मा

अदा शर्मा

अदा शर्माने बॉलिवूडबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तिच्या या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. नक्की काय म्हणाली ती जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 मे : अदा शर्मा सध्या चर्चेत आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या वादग्रस्त चित्रपटात अदाने शालिनी उन्नीकृष्णन ही मुख्य भूमिका साकारली होती. तिने यापूर्वी टीव्ही तसेच हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. अदा शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असली तरी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली आहे. आता अदा शर्माने बॉलिवूडबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तिच्या या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. नक्की काय म्हणाली ती जाणून घ्या. अदा शर्माने अलीकडेच सिद्धार्थ कन्ननच्या चॅट शो मध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान अदा म्हणाली, ‘मला या इंडस्ट्रीमध्ये अनेक चांगले लोक भेटले. जर तुमचा दिग्दर्शक चांगला असेल, तर तुम्ही कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करू शकता. इंडस्ट्रीमध्ये काम करताना चांगले-वाईट दोन्ही लोक भेटले. महिला कलाकारांनी समान मानधनाच्या मागणीपूर्वी सर्वप्रथम बॉलीवूडमधील लैंगिक भेदभावाबाबत भाष्य केले पाहिजे.’ या अभिनेत्रीने बॉलिवूडवर लिंगभेदाचा खळबळजनक आरोप केला आहे. अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये महिला कलाकारांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीबाबत भाष्य केले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अदा पुढे म्हणाली, ‘बॉलीवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींसाठी समान फीची मागणी करण्यापूर्वी, लोकांनी आधी येथील लैंगिक भेदभावाबद्दल बोलले पाहिजे.’ याबद्दल बोलताना ती म्हणाली की, ‘शूटिंगसाठी आधी हिरॉईनला सेटवर बोलवतात, मग खूप वेळ थांबवतात. सर्व चौकशी करून हिरोचा मॅनेजर सेटवर येतो. त्यानंतर हिरो येतो. परंतु या सगळ्यात हिरॉईन खूप आधीपासून सेटवर उपस्थित असते याकडे कोणीही पाहत नाही. हा भेदभाव बॉलीवूडमध्ये प्रकर्षाने जाणवला. अशा वातावरणात काम करायला मला अजिबात आवडत नाही.’ सुंदरा मनामध्ये भरली फेम ‘ही’ अभिनेत्री होणार आई; वाढदिवशीच चाहत्यांना दिली गुड न्यूज अदा शर्माच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन आठवडे पूर्ण केले आहेत. तीन आठवड्यांत, चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 194.57 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. चौथ्या वीकेंडमध्ये हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सहज प्रवेश करेल. 15-20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. एवढंच नाही तर 200 कोटींची कमाई करणारा ‘द केरळ स्टोरी’ हा पहिलाच स्त्रीकेंद्रित चित्रपट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही चित्रपटाचे निर्माते विपुल शहा आणि टीमची भेट घेतली.

जाहिरात

अदा शर्माच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं तर ‘द केरळ स्टोरी’ च्या दमदार  यशानंतर  अभिनेत्री लवकरच मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. ‘द गेम ऑफ गिरगिट’या चित्रपटातून ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिला आता मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात