मुंबई, 18 एप्रिल: 90 च्या दशकात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files Movie) सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील (The Kashmir Files Box Office Collection) सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पँडेमिकनंतर या सिनेमाने जबरदस्त कामगिरी केली. हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 250 कोटींचा टप्पा पार केला आणि इतिहास रचला. कारण इतर बिग बजेट सिनेमांच्या तुलनेत या सिनेमाचे बजेट फारच कमी होती. आता लवकरच हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरही पाहता येणार आहे. देशांतर्गत व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ZEE5 (The Kashmir Files on Zee5) ने ‘द कश्मीर फाइल्स’चे स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत. त्यामुळे आता Zee5 वर विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri The Kashmir Files) हा सिनेमा पाहता येणार आहे. ZEE5 वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर सेटसह, ‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नडसह अनेक भाषांमध्ये 190 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध होईल. झी स्टुडिओज आणि तेज नारायण अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आणि विवेक रंजन अग्निहोत्री निर्मित, ‘द कश्मीर फाइल्स’ची कथा विवेक रंजन अग्निहोत्री यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे. या सिनेमात स्टार कास्ट देखील तगडी पाहायला मिळाली होती. त्यामुळे ज्यांना थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहता आला नाही, त्यांना आता घरबसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे. विवेक अग्निहोत्रींनी सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे.
चित्रपटाच्या OTT प्रीमियरबद्दल बोलताना, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले की, द कश्मीर फाइल्स हा केवळ एक चित्रपट नसून एक भावना आणि चळवळ आहे. मला आनंद आहे की या चित्रपटाला जगभरात असा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि आता हा चित्रपट भारतातील सर्वात मोठ्या देशांतर्गत व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म - ZEE5 वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियरसह आणखी लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे.’ हे वाचा- एका सीनमुळे कायमस्वरुपी बिघडला चेहरा, शिक्षणही मिळालं नाही; तरी या ‘खाष्ट सासू’ने मोठ्या पडद्यावर केलं अधिराज्य तर ZEE5 इंडियाचे चीफ बिझनेस ऑफिसर मनीष कालरा म्हणाले की, द कश्मीर फाइल्सला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता हा सिनेमा केवळ ZEE5 वर आणताना आम्हाला आनंद होत आहे, ज्यामुळे लाखो भारतीयांसाठी तो सहज उपलब्ध होईल. '