जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / The Kashmir Files चं IMDb रेटिंग घसरल्यामुळे भडकले विवेक अग्निहोत्री, म्हणाले- हे अनैतिक आहे

The Kashmir Files चं IMDb रेटिंग घसरल्यामुळे भडकले विवेक अग्निहोत्री, म्हणाले- हे अनैतिक आहे

The Kashmir Files चं IMDb रेटिंग घसरल्यामुळे भडकले विवेक अग्निहोत्री, म्हणाले- हे अनैतिक आहे

The Kashmir Files: 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला सुरुवातीला IMDb वर 10 रेटिंग देण्यात आले होते. मात्र आता ते रेटिंग घसरल्याने विवेक अग्निहोत्री यांचा संताप पाहायला मिळाला, त्यांनी याबाबत ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 मार्च: बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा सिनेमा ‘द कश्मीर फाइल्स’ (Vivek Agnihotri Film The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस तर उतरतोच आहे पण त्याचबरोबर समीक्षकांकडूनही वाहवा मिळवतो आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक अशी तगडी स्टार कास्ट आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला सुरुवातीला IMDb वर 10 (The Kashmir Files IMDb Rating) रेटिंग देण्यात आले होते. मात्र आता ते रेटिंग घसरल्याने विवेक अग्निहोत्री यांचा संताप पाहायला मिळाला, त्यांनी याबाबत ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. The Kashmir Files ला आयएमडीबीवर 10/10 रेटिंग देण्यात आले होते. मात्र आता रेटिंग 8.3 झाले आहे. त्यामुळे सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ही बाब चुकीची असल्याचे म्हटलं आहे. आयएमडीबी पेजनुसार या सिनेमासाठी 131,433 वोट मिळाले आहेत. या फिल्मचे रेटिंग घसरण्याला विवेक अग्निहोत्री यांनी Unusual and Unethical (नेहमीपेक्षा वेगळे आणि अनैतिक)  म्हटले आहे. हे वाचा- यशाच्या शिखरावर असताना अचानक गायब झाला होता हनी सिंह आयएमडीबी ही अशी एक वेबसाइट आहे ज्याठिकाणी लोक चांगल्या आणि वाईट आधारांवर चित्रपटांना रेटिंग देतात. या वेबसाइटवर असलेल्या रेटिंगआधारे अनेकजण हे देखील ठरवतात की सिनेमा पाहायचा की नाही. याठिकाणी सिनेमाच्या रेटिंगमध्येच घसरण झाल्याने दिग्दर्शकाने संताप व्यक्त केला आहे.

जाहिरात

एका युजरने विवेक अग्निहोत्री यांना रेटिंग घसरण्याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली, त्यावर रिप्लाय करताना त्यांनी संबंधित ट्वीट केले आहे. दरम्यान चाहते देखील सिनेमाचे रेटिंग घसरल्याने नाराज असल्याचे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन लक्षात येते आहे.

द कश्मीर फाइल्स हा सिनेमा 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला असला तर बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर देखील या सिनेमाचा महत्त्वाचा भाग आहे, त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टनुसार या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 31.6 कोटींचा टप्पा गाठला आहे. पहिल्या दिवशी 4.25 कोटी, दुसऱ्या दिवशी 10.10 कोटी तर तिसऱ्या दिवशी सिनेमाने 17.25 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणण्यात हा सिनेमा यशस्वी ठरत असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात