मुंबई, 15 मार्च- हनी सिंह (Yo Yo Honey Singh) तरुणपिढीचा आवडता गायक-रॅपर आहे. हनीने अनेक धमाकेदार रॅप करत तरुणांना अक्षरशः वेड लावलं होतं. खरं पाहायला गेलं तर हनी सिंहनेच बॉलिवूडला रॅपची ओळख करून दिलीय असं म्हटलं जातं. हनीचे अनेक रॅप सॉन्ग सुपरडुपर हिट ठरले होते. हनी सिंह आज आपला 39 वा वाढदिवस साजरा (Honey Singh Birthday Today) करत आहे. यानिमित्ताने त्याच्याबद्दल माहिती नसलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया. हनी सिंहचं खरं नाव आधी ह्रदेश सिंह असं होतं. बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर तो हनी सिंह या नावाने लोकप्रिय झाला. हनी सिंहचा जन्म 15 मार्च 1983 मध्ये पंजाबमधील होशियारपूर येथे झाला होता. पहिल्या गाण्यातच हनी सिंहला जबरदस्त यश मिळालं होतं. ‘शकल पर मत जाना’ या गाण्यातून त्यानं मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांनतर त्याने एकामागून एक अनेक हिट गाणी गायली आहेत. हनी सिंह हा एक उत्तम गायक, रॅपर, संगीत निर्माता तसेच अभिनेता आहे. पंजाबी चित्रपटांमधून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. हनी सिंहने अनेक रॅप सॉन्ग गायिली आहेत. आणि प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये ‘हाय मेरा दिल’, ‘चार बॉटल वोडका’, ‘ब्रेकअप पार्टी’, ‘ब्लू आईज’ अशा अनेक रॅप सॉन्गचा समावेश आहे. हनी सिंह जेव्हा त्याच्या करिअरच्या शिखरावर होता, तेव्हा तो अचानक गायब झाला. हनी सिंह पडद्यावरून गायब झाल्यानंतर तो ड्रग्जच्या आहारी गेलाय. त्याला दारूचं व्यसन जडलंय. अशा अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. दीड वर्षांनंतर तो अचानक परतला तेव्हा त्याने स्वतःशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले होते. (हे वाचा:
लंडनमध्ये आलिशान बंगला,महागड्या कार, 29 वर्षांची आलिया आहे इतक्या कोटींची मालकीण
**)** याबद्दल सांगताना हनीने म्हटलं होतं, ‘मी नोएडा येथील माझ्या घरी होतो. मी बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त होतो. हे सुमारे 18 महिने माझ्यासोबत सुरु होतं. यादरम्यान मी अनेक डॉक्टरांना दाखवलं, परंतु औषधांचा प्रभाव माझ्यावर होत नव्हता, माझ्यासोबत विचित्र गोष्टी घडत होत्या. असा खुलासा करत हनीने सर्वांनाच धक्का दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.