मुंबई, 11 जून: बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Bollywood Actor Manoj Bajpayee) आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) यांची प्रमुख भूमिका असलेल्या द फॅमिली मॅन 2 (The Family Man 2) हा द फॅमिली मॅन या वेबसिरीजचा (Web series) दुसरा सीझन नुकताच रिलीज झाला. 4 जूनला रिलीज झालेला हा सीझन अॅमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) स्ट्रीम केला गेला आहे. सध्या ही सिरीज अनेक कारणांनी चर्चेत आहे. एकाबाजूने प्रेक्षकांकडून या सिरीजला अतिशय चांगली पसंती मिळत असताना दुसऱ्या बाजूने वादांमुळे ती चर्चेत आहे. सोशल मीडियावर मीम्सचा तर पाऊस पडला आहे. डायलॉग, प्रसंग, यातील पात्र या विषयांवर हजारो मीम्स शेअर केले जात आहे. मात्र या सगळ्यात एक प्रश्न लोकांच्या मनात सीझन 1 पासून कायम आहे. या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना सीझन 2 मध्ये देखील मिळालेले नाही. हा प्रश्न आहे ‘लोनावला में क्या हुआ था?’ (Lonavla Me kya Hua Tha). अर्थात या सीरिजमधील पात्र अरविंद आणि सुची लोणावळामध्ये बिझनेस ट्रीपसाठी गेले असताना काय घडलं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर श्रीकांत तिवारीची (मनोज वाजपेयीने साकारलेली भूमिका) पत्नी सुचित्रा किंवा त्याचा मित्र अरविंद देऊ शकतो. हे वाचा- सुशांतवर रुसल्या होत्या ‘श्रीकृष्णा’च्या मुली, अभिनेत्याने अशी केली मनधरणी फॅमिली मॅन 2 या सीझनमध्ये मनोज वाजपेयी अर्थात श्रीकांत तिवारी हा बहुतांश वेळ सुचित्रावर कशाचा परिणाम होत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. कारण ती सातत्याने स्वतःपासून दूर जात असते. बहुतांश प्रेक्षकांचे असे मत आहे की आपला सहकारी अरविंदच्या मदतीनं सुचित्राने श्रीकांतला धोका दिल्यानं ती चिंतेत असावी. परंतु, यावर स्वतः मनोजने प्रतिक्रिया दिली आहे.
पिपिंग मून वेबसाइटशी बोलताना मनोज वायपेयीने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना मनोजने सांगितले की अगदीच सांगायचं झालं तर खुद्द श्रीकांतलाही याबाबत काही माहिती नाही. त्याला देखील याबाबत कोणताही संकेत मिळालेला नाही. तुम्ही खूप काही पाहिलयं आणि तुम्हाला खूप काही माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे की श्रीकांत तिथे नव्हता. श्रीकांत केवळ एकच गोष्ट जाणतो आणि ती म्हणजे त्याची पत्नी या वैवाहिक बंधनात खूश नाही. हे वाचा- ‘नवनाथांची’ गाथा दिसणार छोट्या पडद्यावर; सोनी मराठीवर नव्या मालिकांची मेजवानी मनोज वाजपेयी पुढे बोलताना म्हणाला, ‘श्रीकांत, सुचित्राचा दृष्टीकोन जाणून घेऊ इच्छितो. तो कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. जेव्हा केव्हा तो या विषयावर बोलतो तेव्हा तो स्वतःच खूप घाबरलेला आणि चिंतेत असतो. स्वतःला सुचित्राच्या जागेवर ठेऊन पाहायचं असं दिग्दर्शक आणि मेकर्सनं ठरवलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. मी स्वतःच जाणून घेऊ इच्छितो की तिथं नेमकं काय झालं होतं?’