‘नवनाथांची’ गाथा दिसणार छोट्या पडद्यावर; सोनी मराठीवर नव्या मालिकांची मेजवानी

‘नवनाथांची’ गाथा दिसणार छोट्या पडद्यावर; सोनी मराठीवर नव्या मालिकांची मेजवानी

चार नव्या मालिकांसह सोनी मराठीवर मालिकांची मेजवानी. गाथा नवनाथांची ही पौराणिक मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

  • Share this:

मुंबई 11 जून : सध्या छोट्या पडद्यावर पौराणिक मालिका मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. यातच आता आणखी एका मालिकेची भर पडली आहे. ती म्हणजे ‘गाथा नवनाथांची’ (Gatha Navnathanchi) ही मालिका. टीव्हीवर पहिल्यांदाच ही पौराणिक मालिका दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवर नऊ नाथांची कथा  मालिकेत उलगडली जाणार आहे. अनेकांच्या घरी या ग्रंथांच पारायण केलं जातं. तर अनेकांनी ही कथा ऐकलेली देखील असेल. पण पहिल्यांदाच ती पडद्यावर मांडली जात आहे. अशा मालिकांसाठी फार संशोधनाची गरज असते. त्यामुळे मालिकेसाठी प्रेक्षकही उत्सूक असल्याचं पाहायला मिळत आहेत.

मालिकेचा प्रोमो आला असली तरीही मालिकेतील संपूर्ण कास्टची नाव अद्याप समोर आलेली नाहीत. मालिका मागील महिन्यात म्हणजेच 21 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. मात्र लॉकडाऊनच्या (Lockdown) पार्श्वभूमीवर मालिका पुढे ढकलण्यात आली. 21 जूनपासून मालिका सुरू होणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 6:30 वाजता मालिका दिसणार आहे. प्रेक्षकही मालिकेसाठी उत्सूक दिसत आहेत.

याखेरीज आणखीही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘कोण होणार करोडपती’ (KBC Marathi) या शोचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 12 जुलै पासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. सोनी मराठीवरच हा शो दिसणार आहे.

विदेशातील लग्न भारतात अमान्य?; नुसरतप्रमाणे 'या' सेलिब्रिटींनीही बांधली विदेशात लग्नगाठ

याशिवाय आणखी एक क्राइम बेस मालिका सोनी मराठीवर सुरू होत आहे  म्हणजे ‘क्रिमिनल्स : शोध गुन्हेगारांचा’. अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijit Khandkekar) या मालिकेत होस्ट म्हणून दिसणार आहे. 14 जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी मराठीवर आणखी एक नवी मालिका ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunahi Barsat Ahe) ही  मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांची नवी मालिका सुरू होणार आहे.

एकंदरीतच सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची मेजवानीच घेऊन येत आहे. चार नव्या मालिका लवकरच सुरू होणार आहेत. तर ‘तु सौभाग्यवती हो’ ही मालिका काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. तेव्हा जुन्या कोणत्या मालिका प्रेक्षकांचा निरोप तर घेणार नाहीत ना असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला आहे.

Published by: News Digital
First published: June 11, 2021, 2:49 PM IST

ताज्या बातम्या