मुंबई 23 मे : बहूप्रतिक्षित तसेच बहूचर्चित ‘द फॅमिली मॅन 2 (The Family Man 2) चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. तर ट्रेलरला उत्तम प्रतिसादही मिळात आहे. आतापर्यंत युट्युब वर या ट्रेलरला 37 मीलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. पण हा ट्रेलर प्रदर्शित होताच यावर मोठा विवाद निर्माण झाला आहे. आणि यामुळे अभिनेत्री समंथावरही (Samantha Akkineni) बहिष्कार घालण्याची मागणी केली जात होती. पण अखेर आता या वेबसीरिजच्या निर्मात्यांनी यावर भाष्य केलं आहे. या सीरिजच्या ट्रेलरमध्ये तमिळ विद्रोह्यांची तुलना आयसीस सारख्या इस्लामिक आतंकवादी संघटनांशी केल्याचं आरोप केला जात आहे. तमिळ विद्रोही आपल्या हक्कासाठी लढत असताना त्यांना अशाप्रकारे आतंकवादी म्हणून संबोधनं अनेकांकाच्या पचनी पडलेलं नाही. तर यावरच निर्मात्यांनी त्यांत मत व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली होती.
तेजस्विनीनं वाढदिवशी दिलं सरप्राईज; केली नव्या वाटचालीची मोठी घोषणाया वेब सीरिजचे निर्माते राज निदीमोरू आणि कृष्णा डिके यांनी यांनी या विवादावर भाष्य करत म्हटलं की, त्यांनी या सीरिजच्या माध्यमातून भारतातील विविध टॅलेंट्स एकत्र आणले आहेत, व “ही पहिलीच सीरिज किंवा चित्रपट असेल ज्यात अशाप्रकारचा प्रयोग केला आहे. हा आपल्या देशाचा मोठेपणा आहे, उत्कृष्ट परंपरांचा आणि भाषांचा तसेच बुद्धीमत्तेचा हा उत्तम संगम आहे. या मालिकेने आम्हाला ते करण्याची संधी दिली.” “आम्ही प्रत्येक भाषेसाठी त्याला साजेसे कलाकार निवडले आणि त्यासाठी आम्ही फार उत्सुक होतो. मुसा हे पात्र निरज माधव यांनी साकारलं आहे. ते मल्याळी अभिनेते आहेत आणि त्यांनी मल्याळम पात्र साकारलं आहे. तर प्रियामणि ही तमिळ पात्र साकारत आहे आम्ही तिला हिंदी शिकवण्याचा अट्टाहास नाही केला. डीके पुढे म्हणाले सीरिज भारताची दक्षिण ते उत्तर अशी विविधता दाखवते. आपण सगळे या मोठ्या देशाचा भाग आहोत.”
मुलीला पदवीधर झालेलं पाहून शिल्पा शिरोडकर झाली भावुक; फोटो शेअर करत म्हणाली…पुढे ते म्हणाले “आम्ही नेहमीच एक सशक्त महिला पात्र उभ करण्याचा प्रयत्न करत होतो. तेही कथेला धरून, आणि आम्हाला सांगताना आनंद होत आहे की आम्ही एक नव्हे दोन नव्हे तर तीन तीन स्ट्राँग महिला पात्र या दुसऱ्या भागात दाखवली आहेत. तुम्ही असही म्हणू शकता की महिला या सीरिज मध्ये पुरुषांपेक्षा जास्त धाडसी आहेत तर ते नक्कीच अभिमानाच असेल.” ही सीरिज पुढील महिन्यात 4 जून रोजी प्रदर्शित होणार असून अमॅझॉन प्राइम वर पाहता येणार आहे. अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpai), साउथ स्टार समंथा अक्कीनेनी (Samantha Akkineni) , प्रियामणि (Priyamani) यांची मुख्य भूमिका असणार आहे. या सीरिज साठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत.