बॉलिवूड आणि दक्षिणात्य अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने मुलगी पदवीधर झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. मुलगी अनुष्काला पदवीधर झालेलं पाहून शिल्पा भावुक सुद्धा झाल्या आहेत. त्याचबरोबर शिल्पाची बहीण आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरने सुद्धा सोशल मीडियावर स्टोरी शेयर करत आनंद व्यक्त केला आहे. शिल्पा शिरोडकरची मुलगी अनुष्का रणजीत नुकताच उत्तर लंडनमध्ये पदवीधर झाली आहे. अनुष्का आपल्या मावशीच्या म्हणजेच नम्रता शिरोडकरच्या सुद्धा खुपचं जवळ आहे. नम्रताने अनुष्काचे फोटो शेयर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतचं भावुक पोस्ट सुद्धा लिहिली आहे. शिल्पा शिरोडकरने 2000 मध्ये अद्वैश रणजीत सोबत लग्न केलं होतं. आणि त्यांना अनुष्का ही मुलगी आहे. शिल्पा सतत अनुष्काचे फोटो शेयर करून आपलं प्रेम व्यक्त करत असते. शिल्पा शिरोडकर आणि नम्रता शिरोडकर प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. सध्या त्या चित्रपटांपासून दूर आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्त्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत.