मुंबई, 27 मार्च : कोरोना व्हायरसनं (Coronavirus) आता भारताला विळखा घालायला सुरुवात केली आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आलं. त्यामुळे आता घरी राहून नेमकं काय कराव असा प्रश्न सर्व लोकांच्या मनात आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीलाही या Covid – 19 व्हायरसचा फटका बसताना दिसत आहे. सिनेमांचे शूटिंग थांबवण्यात आले आहेत. नवे सिनेमा प्रदर्शित होत नाही आणि डेलिसोपचे शूटिंग सुद्धा बंद पडल्यानं टीव्हीवर काय कार्यक्रम पाहावे हा प्रश्न सध्या निर्माण होताना दिसत आहे. मालिकाची शूटिंग बंद पडल्यानं सध्या अनेक लोकप्रिय मालिका बंद होणयाच्या मार्गावर आहेत. कारण त्यांच्याकडे नवे एपिसोड नाहीत. त्यामुळे आता जवळपास सर्वच टीव्ही चॅनेल्सवर मालिकांचे रिपीट टेलिकास्ट सुरू आहेत. अशा आता केंद्र सरकारनं एकेकाळचा सर्वात लोकप्रिय टीव्ही शो रामायण (Ramayan) पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यांची माहिती त्यांच्या ट्वीटरवरुन दिली. कोरोनामुळे सेलिब्रेटी बसलेत घरी पण शेवंता मात्र रमली आहे या कामात, पाहा VIDEO प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं, सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, लोकांच्या मागणीनुसार रामायण या लोकप्रिय टीव्ही रिटेलिकास्ट 28 मार्चपासून डीडी नॅशनलवर रोज एक एपिसोड सकाळी 9 ते 10 आणि पुन्हा रात्री 9 ते 10 या वेळेत करण्यात येणार आहे.
Happy to announce that on public demand, we are starting retelecast of 'Ramayana' from tomorrow, Saturday March 28 in DD National, One episode in morning 9 am to 10 am, another in the evening 9 pm to 10 pm.@narendramodi@PIBIndia@DDNational
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 27, 2020
रामायण ही दूरदर्शनच्या एकेकाळची सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही मालिका आहे ही अशी मालिका आहे जिनं इतिहास घडविला आणि या मालिकेत काम करणाऱ्य़ा कलाकारांची त्यावेळी वेगळीच चर्चा होती. नुकतीच रामायणची स्टारकास्ट द कपिल शर्मा शोमध्ये आली होती. कपिल शर्माशी गप्पा मारताना प्रत्येकाने खूप धम्माल केली. अमिर खानच्या लेकीचं गुपित झालं उघड म्हणाली, ‘या’ अभिनेत्रीला करायचंय डेट रामायण त्या काळातील अशी एक टीव्ही मालिका होती जेव्हा टीव्हीवर देवाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना खरोखरच रामचं रूप मानलं जात होतं आणि हे कलाकार ज्या गावात किंवा खेड्यात-जायचे तेथे प्रत्येक गावात त्यांचा देवासारखं स्वागत केलं जात होतं. द कपिल शर्मा शोवरील गप्पांमध्ये या स्टारकास्टने शूटिंगच्या काळातील अनेक मजेदार किस्से शेअर केले होते. बादशाहचा नवीन म्युझिक VIDEO ‘गेंदा फूल’ लाँच, जॅकलिन दिसली हॉट बंगाली लुकमध्ये